फोटोत दिसणारी ही चिमुकली लवकरच करणार क्रिकेटर हार्दिक पांड्याशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 12:13 IST2020-02-29T12:08:29+5:302020-02-29T12:13:22+5:30
इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या बोल्ड व हॉट फोटोंनी भरलेले आहे.

फोटोत दिसणारी ही चिमुकली लवकरच करणार क्रिकेटर हार्दिक पांड्याशी लग्न
बॉलिवूडचे अभिनेता-अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सशी कनेक्ट असतात. मॉडेल नताशा स्टेंकोविक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नताशा ही एक सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे. डीजे वाले बावू या गाण्याने नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली. नताशा ही रिअ लाईफइतकीच रिअल लाईफमध्येही कमालीची बोल्ड आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या बोल्ड व हॉट फोटोंनी भरलेले आहे. मात्र नताशाने काही महिन्यांपूर्वी तिच्या बालपणीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओ तिच्या बालपणीपासून ते तारुण्यापर्यंतचे सगळे फोटो आहेत.
बोल्ड नताशा आता पांड्या कुटुंबाची सून होणार आहे. यंदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नताशाने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत साखरपुडा करून सर्वांना आनंदाचा धक्का दिला होता. यानंतर नताशा चांगलीच लाईमलाईटमध्ये आली आहे.
इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या सिनेमात गाण्यात नताशा आयटम सॉन्ग करताना दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित ‘झिरो’ या सिनेमात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यापूर्वी सत्याग्रह, फुकरे रिटर्न, डॅडी या सिनेमात तिने आयटम नंबर केले होते.