करून करून भागली देव पूजेला लागली, अशी आहे सोफिया हयातची अवस्था !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 02:35 PM2020-04-25T14:35:09+5:302020-04-25T14:35:45+5:30
लग्न संस्थेवर विश्वास राहिला नसून एखादा चांगला बॉयफ्रेंड मिळाला तर त्याचा नक्की विचार करेन असं सोफियाने म्हटले होते.
स्वतःला दैवी शक्ती मानणारी सोफिया हयात कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. बोल्डनेस दाखवत किंवा वादग्रस्त विधानं करत तसंच दररोज काही ना काही कारनामे करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा सोफिया प्रयत्न करत असते. कधी काळी तर तिने चक्क नन बनत सांसारिक सुखाचा त्याग करत अध्यात्मकडे वळल्याचेही नाटक केले. तर कधी पती ब्लादसह बिघडलेल्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत होती. पतीपासून वेगळे होत असल्याचं पतीने फसवल्याचा आरोप करत तिने त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. पतीने साखरपुड्याची अंगठी आणि महागडं घड्याळ विकल्याचा धक्कादायक आरोपसुद्धा सोफियाने केला होता. त्याआधी तिने आपण प्रेग्नेन्ट असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर गर्भपाताबाबत दुःख व्यक्त करत एक फोटो शेअर करुन शरीर पूर्वीसारखे राहिले नसल्याचे सांगितले होते. बाळाची चाहुल लागल्यापासून आणि ते गमावल्यानंतर आता शरीराचा शेप बिघडल्याचे तिने म्हटले होते.
पती ब्लादला विसरल्याचे तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. लग्न संस्थेवर विश्वास राहिला नसून एखादा चांगला बॉयफ्रेंड मिळाला तर त्याचा नक्की विचार करेन असं सोफियाने म्हटले होते. कुणी आवडलाच तर त्याला आधी पूर्णपणे जाणून घेईल आणि जो आपल्या दर्जाचा असेल अशाच व्यक्तीशी नातं जोडेल असं सोफियाने नमूद केले होते. शिवाय हा बॉयफ्रेंड ईर्ष्या बाळगणारा असू नये अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली होती.
आता पुन्हा एकदा ही सोफिया चर्चेत आली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने अक्षरक्षः कहर केला आहे. तिचे सेक्सी फोटो पाहून सनी लिओनी, पुनम पांडेदेखील फिक्या पडतील असे फोटोशूट तिने केले आहे. नेहमीच ती तिचे फोटो शेअर करत नवनवीन वाद ओढावून घेते. तिच्या इन्स्टावर नजर टाकल्यास तिने सगळ्याच हद्द पार केल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि आपसुकच ''सोफिया तेरा कुछ नही होना'' असेच शब्द बाहेर पडतील.