मोदींना नेतृत्व करता येत नाही, कृपया राजीनामा द्या...! कंगना राणौतच्या ट्विटने सगळेच ‘हैराण’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 10:09 AM2021-04-28T10:09:11+5:302021-04-28T10:11:18+5:30
कंगनाने ट्विटमध्ये #Resign_PM_Modi हा हॅशटॅग वापरला. तूर्तास हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय.
सततच्या टिवटिवीमुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतचे एक ट्विट सध्या ट्विटरवर ट्रेंड करतेय. होय, मोदीजींना देशाचे नेतृत्व करता येत नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशा आशयाचे तिचे ट्विट क्षणात व्हायरल झाले आणि चक्क कंगनाने मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलेली पाहून पाहून क्षणभर अनेकांना धक्का बसला. कट्टर भाजप समर्थक असलेली, इतकेच नाही तर मोदी माझ्यासाठी पित्यासमान आहेत, म्हणणारी कंगना त्यांच्या राजीनामाच्या मागणी कशी करू शकते? असा प्रश्न अनेकांना पडला. पण कंगनाची ही मागणी उपरोधिक होती. एका ट्रोलर्सला फैलावर घेत कंगनाने हे ट्विट केले. आपल्या या ट्विटमध्ये तिने मोदी आणि स्वत:सह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गानसम्रानी लता मंगेशकर यांचाही उल्लेख केला.
कंगनाचे ट्विट
मोदींना देशाचे नेतृत्व कसे करावे कळत नाही... कंगनाला अभिनय येत नाही... सचिनला बॅटिंग येत नाही आणि लता दीदींना गाता येत नाही... पण या ‘चिंदी’ ट्रोलर्सला सर्व काही येते. मोदीजी कृपया राजीनामा द्या आणि विष्णु अवतारातील या ट्रोलर्सना देशाचे पंतप्रधान बनवा,’ असे उपरोधिक ट्विट तिने केले. या ट्विटमध्ये कंगनाने#Resign_PM_Modi हा हॅशटॅग वापरला. तूर्तास हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय.
गेल्या काही दिवसांपासून ट्रोलर्स मोदींवर निशाणा साधत आहेत. मोदींमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली, असा आरोप अनेक ट्रोलर्सनी केला आहे. याच ट्रोलर्सना कंगनाने उपरोधिक शब्दांत उत्तर दिले आहे.
पुन्हा झाली ट्रोल
उपरोधिक ट्विट करून कंगनाने ट्रोलर्सना सुनावले. पण यानंतर ट्रोलर्सने कंगनाला पुन्हा ट्रोल करणे सुरु केले. ‘ तू ट्विटमध्ये म्हणालीस ते 100 टक्के खरे आहे. फक्त सचिन आणि लतादीदींना वगळून टाक. कारण तू आणि मोदीजी ग्रेट अॅक्टर्स आहात, हे अगदी खरे आहे,’ असे एका युजरने लिहिले.
किती चमचेगिरी करशील, देशासाठी काही मदत केलीस? किती पैसे दान केलेस? ट्विटरवर संताप दाखवून काही अर्थ नाही? अशा शब्दांत एका युजरने तिचा क्लास घेतला.