दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 02:41 PM2024-06-23T14:41:59+5:302024-06-23T14:42:18+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Mom To Be Deepika Padukone And Ranveer Singh In London Restaurant Babymoon Video Viral | दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS

दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याचं आगमन होणार आहे. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. दीपिका पादुकोण ही आता लंडनमध्ये चांगला वेळ घालवताना दिसतंय. ती पती रणवीर सिंह याच्यासोबत लंडनला पोहचलीये. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

दीपिकाच्या नव्या व्हिडीओमध्ये ती पती रणवीरसमवेत वेळ घालवत आहे. दीपिका आणि रणवीर हे एकमेकांचा हात धरून लंडनमधील एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. दीपिकाच्या सुरक्षेसाठी यावेळी त्यांच्यासोबत बॉडिगार्डसही दिसून आले. यावेळी दीपिका डेनिम जीन्ससोबत ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली. तर रणवीर ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड शर्ट आणि ब्लॅक ट्राउजरमध्ये हँडसम दिसत होता.

दीपिका ही सध्या 6 महिन्यांची गरोदर आहे आणि सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये स्टार कपलने खुलासा केला आहे की,"सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे". 

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा 'फायटर' (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दीपिकाचा अजय देवगन स्टारर 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अजय देवगनच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातही अभिनेत्री झळकणार आहे. सध्या, दीपिका ब्रेकवर आहे, कधीकधी ती इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये किंवा तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.

Web Title: Mom To Be Deepika Padukone And Ranveer Singh In London Restaurant Babymoon Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.