Most Googled Weddings 2018 : गुगलच्या टॉप-5 लिस्टमध्ये प्रियांका व दीपिकाचेही लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 03:47 PM2018-12-14T15:47:30+5:302018-12-14T15:51:12+5:30

यंदाचे 2018 हे वर्ष हाय प्रोफाईल सेलिब्रिटींच्या लग्नांनी गाजले. आता गुगलने 2018 तील सर्वाधिक ‘सर्च’ झालेल्या लग्नांची एक यादी जाहिर केली आहे. या यादीतील लक्षवेधी गोष्ट कुठली तर जगभरातील ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या या यादीत प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाचाही समावेश आहे.

Most Googled Weddings 2018: deepika and priyanka marriage in top-5 list Of most googled weddings 2018 | Most Googled Weddings 2018 : गुगलच्या टॉप-5 लिस्टमध्ये प्रियांका व दीपिकाचेही लग्न!!

Most Googled Weddings 2018 : गुगलच्या टॉप-5 लिस्टमध्ये प्रियांका व दीपिकाचेही लग्न!!

googlenewsNext
ठळक मुद्दे2018 मधील ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत सर्वात पहिला क्रमांक आहे तो, प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांच्या लग्नाचा.

यंदाचे 2018 हे वर्ष हाय प्रोफाईल सेलिब्रिटींच्या लग्नांनी गाजले. आता गुगलने 2018 तील सर्वाधिक ‘सर्च’ झालेल्या लग्नांची एक यादी जाहिर केली आहे. या यादीतील लक्षवेधी गोष्ट कुठली तर जगभरातील ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या या यादीत प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाचाही समावेश आहे. होय, बॉलिवूडच्या या दोन ललनांचे लग्नही गुगलच्या टॉप-5 लिस्टमध्ये आहे. याचा अर्थ भारतीय सेलिब्रिटींचे हे लग्न विदेशातही ट्रेंडमध्ये राहिले.

2018 मधील ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत सर्वात पहिला क्रमांक आहे तो, प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांच्या लग्नाचा. 19मे 2018 रोजी प्रिन्स हॅरी व मेगन मार्कलचे शाही लग्न झाले. ब्रिटनच्या राज घराण्यातील  या लग्नाची जगभरात चर्चा झाली.

‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत दुसºया क्रमांकावर आहे, ते प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न. गत १ व २ डिसेंबरला प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवनात दोघांनीही ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. निक अमेरिकन आहे आणि प्रियांका भारतीय. पण प्रियांकाचा हॉलिवूडमध्येही दबदबा आहे. अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’नंतर प्रियांका ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जातेय. त्यामुळे या लग्नावर अख्ख्या जगाच्या नजरा खिळल्या होत्या.

‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत दीपिका पादुकोण व रणवीरचे लग्न पाचव्या स्थानावर आहे. दीपवीरने गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे लग्न केले. सिंधी व कोंकणी पद्धतीने हे लग्न झाले. दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी भारतीय क्रेझी झाले होते. म्हणून भारतीयांनी या लग्नाचे फोटो सर्च केलेत. पण विदेशातही या रॉयल वेडिंगची क्रेझ होती. 

गुगलच्या या यादीत तिस-या क्रमांकावर प्रिन्सेस  Eugenieचे लग्न आहे .

चौथ्या स्थानावर  Kat Von Dचे लग्न आहे.

Web Title: Most Googled Weddings 2018: deepika and priyanka marriage in top-5 list Of most googled weddings 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.