mother day 2022: 'पूनम पांडेची आई होणं सोपं नाही'; अभिनेत्रीनेच सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 15:23 IST2022-05-08T15:23:19+5:302022-05-08T15:23:51+5:30
Poonam pandey: लॉक अप (Lock Upp) या शोमध्ये पहिल्यांदाच पूनमच्या आईने हजेरी लावली आणि तिची आई सर्वांसमक्ष आली.

mother day 2022: 'पूनम पांडेची आई होणं सोपं नाही'; अभिनेत्रीनेच सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी
हॉट फोटोशूट वा व्हिडीओशूट करुन कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे (Poonam Pandey). अलिकडेच पूनमने कंगना रणौतच्या(Kangana Ranaut) लॉक अप (Lock Upp) या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये पूनमच्या स्वभावाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना अनुभवता आली. यात तिने लहानपणापासून केलेला स्ट्रगल, करिअरसाठी केलेली स्टंटबाजी यासारख्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामध्येच मदर्स डे निमित्त तिने 'बॉलिवूड लाइफ'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आईविषयी भाष्य केलं असून पूनम पांडेची आई होणं तिच्यासाठी सोपं नव्हतं असं पूनमने सांगितलं.
लॉक अप (Lock Upp) या शोमध्ये पहिल्यांदाच पूनमच्या आईने हजेरी लावली आणि तिची आई सर्वांसमक्ष आली. विशेष म्हणजे गेल्या कित्येक काळापासून पूनम आणि तिच्या कुटुंबाचा काहीही संबंध नव्हता. तिच्या कुटुंबाने तिला सोडून दिलं होतं. त्यामुळे आईला या शोमध्ये पाहिल्यानंतर पूनमलादेखील धक्का बसला. परंतु, या शोमुळे माझी आई मला परत मिळाली अशी भावना तिने व्यक्त केली.
"माझी आई या शोमध्ये येणार नाही हे मला चांगलंच माहित होतं त्यामुळे मला थोडी भीतीदेखील होती. कारण, मी केलेल्या चुकांमुळे ती माझ्यावर प्रचंड संतापली होती. पण, ती या शोमध्ये आली आणि तिने मला माफदेखील केलं. मला चांगलंच माहितीये की, पूनम पांडेची आई होणं तिच्यासाठी सोपं नव्हतं", असं पूनम म्हणाली.
पुढे ती म्हणते, "माझ्यासारखी मुली असल्याची कल्पनादेखील मी करु शकत नाही. जर मी तिच्या जागी असते तर, मी काय केलं असतं? असा प्रश्न सतत मला पडतो. मी तिच्यासारखं सगळं मान्य करु शकले असते की नाही? मला नाही माहित हे सगळं मी शब्दात कसं मांडू. पण, आज ती माझ्यासोबत आहे त्यामुळे मी मनापासून तिचे आभार मानते. आणि, माझ्या असंख्य चुकादेखील तिने पदरात घेतल्या त्यासाठीही मी मनोमन तिचे आभार मानते."
दरम्यान, ती एक आई आहे आणि आई अशीच असते. त्यामुळे प्रत्येक मुलीने निदान आज तरी आपल्या आईला कडकडून मिठी मारा आणि तिचे आभार माना. एकेकाळी हॉट व्हिडीओमुळे चर्चेत येणारी पूनम सध्या लॉक अपमुळे चर्चेत येत आहे.