सासू जयाबाईने मारला ऐश्वर्याला टोमणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 03:47 PM2016-10-28T15:47:15+5:302016-10-28T15:47:15+5:30

सासू-सूनेची भांडणं ही सर्व घरांमध्ये सारखीच. सुनेला उठता-बसता टोमणे मारणाऱ्या  सासवा आपल्या अवती-भवती दिसतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरात असले काही ...

Mother-in-law to save Aishwarya? | सासू जयाबाईने मारला ऐश्वर्याला टोमणा?

सासू जयाबाईने मारला ऐश्वर्याला टोमणा?

googlenewsNext
सू-सूनेची भांडणं ही सर्व घरांमध्ये सारखीच. सुनेला उठता-बसता टोमणे मारणाऱ्या  सासवा आपल्या अवती-भवती दिसतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरात असले काही नसेल, असे तुम्ही मानत असाल तर कदाचित तुम्ही चुकता आहात.  आता ऐश्वर्याचा सासूबाई जया बच्चन यांचेच उदाहरण घ्या ना. कधीकाळी एकामागोमाग एक हिट चित्रपट दिलेल्या जया बच्चन यांनी सुनेला अप्रत्यक्षरित्या असा काही टोमणा मारला की, सगळे चाटच पडलेत.

अलीकडे जया बच्चन  ‘मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाल्या. यावेळी जया जे काही बोलत्या,ते ऐकून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. खरे तर जया आजच्या चित्रपटांबद्दल बोलल्या. पण त्यांचे हे बोलणे म्हणजे ऐश्वर्याला जोरदार टोमणा होता, असेच सगळ्यांना वाटून गेले. ‘आधीचे दिग्दर्शक रचनात्मक चित्रपट बनवायचे. आता केवळ बॉक्स आॅफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवण्याच्या इराद्याने चित्रपट बनवले जातात. आधी चित्रपटाचा दर्जा बघितला जायचा. आता केवळ आकडा बघितला जातो... शरम नाम की चीज ही नहीं है, असे जया म्हणाल्या. आता ‘शरम नाम की चीज ही नहीं है...’, हे वाक्य जयांनी नेमके कुणासाठी म्हटले आणि का म्हटले, हे ठाऊक नाही.  

सध्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मधील ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सशी जोरदार चर्चा सुरु आहे. बच्चन कुटुंब ऐश्वर्याच्या या सीन्समुळे नाराज असल्याचीही खबर आहे. आता जयांचा इशारा याकडे तर नव्हता ना, असा प्रश्न आम्हाला पडलाय. तुम्हाला काय वाटते?  

aeshwarya roy bacchan

Web Title: Mother-in-law to save Aishwarya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.