Mothers Day 2019 ; स्टार्सनी साजरा केला मदर्स डे! नाना पाटेकर आणि जान्हवी कपूरची पोस्ट वाचून व्हाल भावूक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 14:33 IST2019-05-12T14:31:56+5:302019-05-12T14:33:13+5:30
आज सर्वत्र साजरा होतोय तो जागतिक मातृदिन. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी या खास दिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण यातल्या काही पोस्ट निश्चितपणे भावूक करणाऱ्या आहेत.

Mothers Day 2019 ; स्टार्सनी साजरा केला मदर्स डे! नाना पाटेकर आणि जान्हवी कपूरची पोस्ट वाचून व्हाल भावूक!!
आज सर्वत्र साजरा होतोय तो जागतिक मातृदिन. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी या खास दिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण यातल्या काही पोस्ट निश्चितपणे भावूक करणाऱ्या आहेत. यातली एक पोस्ट म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांची पोस्ट आणि दुसरी पोस्ट म्हणजे, जान्हवी कपूरची पोस्ट.
आई तीन महीन्या पूर्वी गेली आणि
— Nana Patekar (@nanagpatekar) May 12, 2019
मी अचानक, मुलाचा, म्हातारा झालो.
आता कोणी दम देत नाही...
आईच्या आठवणीत नानांनी कमालीची भावूक पोस्ट लिहिली आहे.‘आई तीन महिन्यांपूर्वी गेली आणि मी अचानक मुलाचा म्हातारा झालो. आता मला कोणी दम देत नाही,’अशा शब्दांत त्यांनी आईची आठवण केली आहे. नानांची आई निर्मला पाटेकर यांचे जानेवारीत वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या.
आई हयात असताना एका मुलाखतीत नाना असेच भावूक झाले होते. आईबद्दल बोलताना मला काहीतरी होत. ती आता फार दिवसांची सोबती नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे घरून फोन आला की, माझ्या काळजाचा ठोका चुकतो. मी घाबरतो. मी बाहेर जायला निघालो की, ती माझा हात पकडते आणि रडायला लागते, असे नाना या मुलाखतीत म्हणाले होते.
जान्हवीने मदर्स डे निमित्त आई श्रीदेवीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला. श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांना हा जुना फोटो पाहणे, अनेकांना भावूक करणारा आहे.
याशिवाय अनेक स्टार्सनी आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत, आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.