गाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी! पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:34 AM2018-09-24T11:34:37+5:302018-09-24T11:36:23+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. होय, आत्तापर्यंत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील अनेक पात्रांचा फर्स्ट लूक रिलीज झालाय.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. होय, आत्तापर्यंत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील अनेक पात्रांचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. आज चित्रपटातील लीड हिरो अर्थात आमिर खानचा लूक सुद्धा रिलीज झाला. आमिरचा हा लूक पाहून पुन्हा एकदा तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. केवळ इतकेच नाही तर हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतो, असे तुम्हाला होईल. या मोशन पिक्चरमध्ये फिरंगी बनलेला आमिर गाढवावर बसलेला दिसतोय. निश्चितपणे आमिर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
अद्याप ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा ट्रेलर आलेला नाही. ट्रेलरसाठी आमिर खान व या चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा यांनी २७ सप्टेंबरचा मुहूर्त निवडला आहे. यामागचे खास कारण म्हणजे, या दिवशी यश चोप्रा यांची जयंती आहे. या माध्यमातून दिवंगत यश चोप्रा यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे.
ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. या चित्रपटातील फँटसी, अॅक्शन हे प्रेक्षकांना खरेखुरे वाटावे यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रयत्न केले आहेत. आजवर बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याच आऊटडोर चित्रीकरणाला इतका पैसा वापरण्यात आलेला नव्हता असे म्हटले जाते. या चित्रपटासाठी खास दोन जहाजांची निर्मिती देखील करण्यात आली असून या जहाजांचे वजन जवळजवळ दोन लाख किलोच्या आसपास आहे. ही जहाजं बनवण्यासाठी वर्षांहून अधिक काळ लागला होता. तसेच गेम्स ऑफ थ्रोन्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचे चित्रीकरण ज्या समुद्रकिनारी झाले, तिथेच या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.