मौनी रॉयनं शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक व्हिडीओ, पूल पार्टीत धम्माल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:41 PM2022-02-03T12:41:26+5:302022-02-03T12:43:34+5:30

Mouni Roy And Suraj Nambiar Pool Party Video : ‘माय बंच ऑफ फूल्स’ असं कॅप्शन देत मौनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आफ्टर वेडिंग पूल पार्टीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

Mouni Roy And Suraj Nambiar Raise The Temperature Shares Glimpses Of Their Pool Party | मौनी रॉयनं शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक व्हिडीओ, पूल पार्टीत धम्माल मस्ती

मौनी रॉयनं शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक व्हिडीओ, पूल पार्टीत धम्माल मस्ती

googlenewsNext

मौनी रॉय (Mouni Roy) व सूरज नांबियार (Suraj Nambiar ) यांच्या कलरफुल वेडिंगचे फोटो व व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे दिपले. सोशल मीडियावर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस नांबियारच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. होय, मौनीने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. आफ्टर वेडिंग पूल पार्टीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मौनी व सूरज धम्माल मज्जा करताना दिसत आहेत.  यात मौनीचे खास मित्रही मज्जामस्ती करताना दिसत आहे. अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मंदिरा बेदी हे देखील या पार्टीत हजर आहेत. व्हिडीओमध्ये मौनी रॉय पती सूरज नांबियार सोबत रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. दोघांनीही सर्वांसमोर लिपलॉक किस केलं, तो क्षणही या व्हिडीओत आहे.   ‘माय बंच ऑफ फूल्स’ असं कॅप्शन देत मौनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

मौनी रॉय आणि सूरज नांबियारने 27 जानेवारीला गोव्यात लग्नगाठ बांधली. सकाळी दोघांनी मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केले. यानंतर रात्री या कपलने बंगाली रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केलं. अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीय या लग्नाला हजर होते. सूरज हा दुबईत राहतो. बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी त्याची ओळख आहे. सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. जैन कुटुंबात जन्मलेल्या सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे. 

सूरजने अशोक इंडिया या कंपनीत इंटर्न म्हणून काम केले होते. सध्या तो इन्व्हिक्टस म्हणून एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहे. तो, असोसिएशन ऑफ चार्टर्ड अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्टचा सदस्य असून, युएईमधील कॅपिटल मार्केटचा डायरेक्टर हेड आहे. 
सूरजला ट्रॅव्हलिंग आणि बाईक रायडिंगची आवड आहे. त्याचं इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर हे लक्षात येतं. 

Web Title: Mouni Roy And Suraj Nambiar Raise The Temperature Shares Glimpses Of Their Pool Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.