‘ही’ अभिनेत्री तिस-यांदा पडली प्रेमात, बोभाटा होताच डिलीट केला फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 03:15 PM2019-10-11T15:15:02+5:302019-10-11T15:15:39+5:30
चर्चा खरी मानाल तर या अभिनेत्रीच्या आयुष्यात एका स्पेशल व्यक्तिची एन्ट्री झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय अॅक्टिंगसोबतच लूकमुळेही चर्चेत असते. टीव्हीचा पडदा गाजवल्यानंतर मौनीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि एकापाठोपाठ एक सिनेमे साईन करत सुटली. आता तर टीव्हीला रामराम ठोकत मौनी बॉलिवूडमध्ये रमली आहे. अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ हा मौनीचा पहिला चित्रपट. यानंतर ब्रह्मास्त्र, मेड इन चायना अशा अनेक चित्रपटांत तिची वर्णी लागली. पण तूर्तास आम्ही मौनीच्या चित्रपटांबद्दल नाही तर तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगणार आहोत. चर्चा खरी मानाल तर मौनीच्या आयुष्यात एका स्पेशल व्यक्तिची एन्ट्री झाली आहे. होय, म्हणजे मौनी हिला नवे प्रेम मिळाले आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, मौनी सध्या सूरज नंबियार याला डेट करत आहेत. सूरज दुबईत बँकर आहे. नुकताच मौनीने थायलंडमध्ये बर्थ डे साजरा केला. याठिकाणी सूरजही हजर होता. मौनीची मैत्रिण रूपाली काडयान हिने सोशल मीडियावर सूरज व मौनीचा एक फोटो शेअर केला आणि अचानक मौनीच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्यात. यानंतर लगेच रूपालीने मौनी व सूरजचा फोटो डिलीट केला. रूपालीने शेअर केलेला मौनी व सूरजचा फोटो थायलंडचा होता.
अर्थात मौनीने डेटिंगच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. सूरज माझा केवळ मित्र आहे. आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी मिळून थायलंडला माझा बर्थ डे साजरा करण्यासाठी गेलो होतो. मी अद्यापही सिंगल आहे आणि आपल्या कामावर फोकस करतेय, असे ती म्हणाली. रूपालीने तुझा व सूरजचा फोटो का डिलीट केला? याबद्दल विचारले असता, तिने थेट उत्तर देणे टाळले. असे काहीही नव्हते, एवढेच ती म्हणाली.
सूरजआधी मौनी अभिनेता मोहित रैना याला डेट करत होती. 2011 मध्ये ‘देवों का देव महादेव’च्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले होते. त्याआधी अभिनेता गौरव चोप्रासोबत मौनीचे नाव जोडले गेले होते.