म्हणून मौनी रॉय घेतेय गरब्याचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 06:00 AM2019-02-24T06:00:00+5:302019-02-24T06:00:00+5:30
'गोल्ड' सिनेमातून अक्षयकुमारसोबत बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय आता सगळ्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टमधून आणखीन एक मोठे सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाली आहे.
'गोल्ड' सिनेमातून अक्षयकुमारसोबत बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय आता सगळ्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टमधून आणखीन एक मोठे सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाली आहे. मौनी तिच्या आगामी 'मेड इन चायना' या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसेल.
सध्या मौनी अहमदाबादमध्ये या सिनेमाचे शूटिंग करते आहे. विशेष म्हणजे मौनी या सिनेमात गुजराती संस्कृतीची खासियत असलेले गरबा हे लोकनृत्य करताना दिसणार आहे. स्वतः मौनी या जबरदस्त ऊर्जा असलेल्या गाण्याच्या शूटिंगसाठी उत्साहित असून तिने त्यासाठी तयारीला सुरुवातही केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'मौनीने नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून ती तिच्या नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाते. असे असले तरी तिने शूटनिमित्त गरबा नृत्य गुजरातमधील एका प्रशिक्षकाकडून शिकून घेतले आहे. इतकेच नव्हे तर मौनीने हे नृत्य करताना ते सहज वाटावे यासाठी इंटरनेटवरही अनेक गरबाचे व्हिडीओज बघितले आहेत.' लवकरच ती या गाण्याचे शूट अहमदाबादमध्ये करणार आहे.
मौनी सांगते, 'गरबा हा एकदम सहज आणि सुंदर नृत्यप्रकार आहे. लोकांना गरबा करताना बघायला मला नेहमीच आवडत आले आहे. मात्र पडद्यावर मला एका गुजराती लोकसंगीतावर ते करण्याची संधी मिळेल असे कधी वाटले नव्हते. आता या गाण्याच्या शूटिंगसाठी मी उत्साही आहे'.