हा फोटो पाहून नेटक-यांनी राखी सावंतशी केली मौनी रॉयची तुलना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 13:38 IST2019-06-05T13:37:08+5:302019-06-05T13:38:00+5:30

काल मौनी रॉयने सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. पण हे काय? मौनीचे या इव्हेंटमधील फोटो पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

mouni roy troll compare with rakhi sawant | हा फोटो पाहून नेटक-यांनी राखी सावंतशी केली मौनी रॉयची तुलना!

हा फोटो पाहून नेटक-यांनी राखी सावंतशी केली मौनी रॉयची तुलना!

ठळक मुद्देगतवर्षी अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ या चित्रपटातून मौनीचा दणकेबाज बॉलिवूड डेब्यू झाला.

मौनी रॉय आता टीव्ही अभिनेत्री नाही तर बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. काल तिने सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. पण हे काय? मौनीचे या इव्हेंटमधील फोटो पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. शॉर्ट ब्लॅक, ब्लॅक श्ूज आणि नियॉन कलरचा जॅकेट असा मौनीचा लूक होता. पण लोकांचे लक्ष तिच्या या लूककडे न जाता तिच्या सुजलेल्या ओठांकडे गेले आणि नेटकºयांनी तिची खिल्ली उडवणे सुरु केले. इतके कमी की काय म्हणून,अनेक नेटक-यांनी तिची तुलना थेट राखी सावंतशी केली.

यापूर्वी अनेकदा मौनीला तिच्या ओठांच्या शस्त्रक्रियेवरून ट्रोल करण्यात आले होते. अलीकडे एका मुलाखतीत मौनीला तिच्या लिप्स सर्जरीबद्दल विचारल्यावर ती चांगलीच भडकली होती.


गतवर्षी अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ या चित्रपटातून मौनीचा दणकेबाज बॉलिवूड डेब्यू झाला. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाईच केली नाही तर प्रेक्षक व समीक्षकांनीही या चित्रपटातील मौनीच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच मौनीने अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ साईन केला होता. यापाठोपाठ जॉन अब्राहमचा ‘रोमियो अकबर वॉल्टर’ आणि राजकुमार रावचा ‘मेड इन चायना’ हे दोन चित्रपटही तिच्या झोळीत पडले.
छोट्या पडद्यावर ‘देवों के देव महादेव’ मालिकेत पार्वतीची भूमिका साकारण्याची संधी लाभली आणि मौनी लोकप्रिय झाली. पाठोपाठ ‘नागीन’ या लोकप्रिय मालिकेने ती घराघरांत पोहोचली.सध्या मौनीला अनेक टीव्ही मालिका आणि पौराणिक मालिकांसाठीही आॅफर्स येत आहेत. मात्र आता तिला केवळ बॉलिवूडवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.  

Web Title: mouni roy troll compare with rakhi sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.