गलतीसे मिस्टेक! मौनी रॉयने चुकून राजनाथ सिंहांना केलं टॅग, यूजर्स म्हणाले - ताई, NCB वाले उचलून नेतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 01:07 PM2020-09-30T13:07:55+5:302020-09-30T13:08:36+5:30

आता जसं या गोष्टीकडे सोशल मीडिया यूजर्सचं लक्ष गेलं. त्यांनी मौनी रॉयला ट्रोल करणं सुरू केलं. मौनीने हे ट्विट मध्यरात्री १.२२ वाजता केलं होतं.

Mouni Roy trolled for tagging Rajnath Singh instead of Raj Nayak in her thank you tweet on birthday users funny reaction | गलतीसे मिस्टेक! मौनी रॉयने चुकून राजनाथ सिंहांना केलं टॅग, यूजर्स म्हणाले - ताई, NCB वाले उचलून नेतील...

गलतीसे मिस्टेक! मौनी रॉयने चुकून राजनाथ सिंहांना केलं टॅग, यूजर्स म्हणाले - ताई, NCB वाले उचलून नेतील...

googlenewsNext

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मौनी रॉयने नुकताच म्हणजेच २८ सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा केला. गेल्या काही दिवसांपासून ती या दिवसाच्या तयारीत होती. मौनीने तिचा वाढदिवस मालदीव्समध्ये धडाक्यात साजरा केला. सोशल मीडियातून अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या. पण अशात धन्यवाद देताना तिच्याकडून एक चूक झाली. तिने चुकून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केलं आणि हार्ट इमोजीही दिला.

झालं असं की, वाढदिवसाच्या दिवशी मौनीला सोशल मीडियातून भरभरून शुभेच्छा आल्या. यात मीडिया पर्सनॅलिटी राज नायक यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्चा दिल्या. पण मौनीने त्यांचे धन्यवाद मानताना ट्विटमध्ये चुकून राजनाथ सिंह यांना टॅग केले. 

आता जसं या गोष्टीकडे सोशल मीडिया यूजर्सचं लक्ष गेलं. त्यांनी मौनी रॉयला ट्रोल करणं सुरू केलं. मौनीने हे ट्विट मध्यरात्री १.२२ वाजता केलं होतं.

या ट्विटवरून मौनी आता ट्रोल होऊ लागली आहे. एका यूजरने लिहिले की, 'ताई एनसीबीवाले उचलून नेतील'. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, 'तू तर थेट डिफेन्स मिनिस्टरला टॅग केलं. तो परिसर तर कंगना मॅमचा आहे'.

काही यूजर्सना तर मौनीच्या या चुकीवरून मीम्स बनवायलाही सुरूवात केली. दरम्यान, मौनी लवकरच 'लंडन कॉन्फिडेन्शिअल' आणि 'ब्रम्हास्त्र' या मोठ्या बॅनरच्या सिनेमात दिसणार आहे.
 

Web Title: Mouni Roy trolled for tagging Rajnath Singh instead of Raj Nayak in her thank you tweet on birthday users funny reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.