"स्टारडम मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांचं वागणं बदललं", मौसमी चॅटर्जींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:30 IST2024-12-23T15:30:00+5:302024-12-23T15:30:24+5:30

प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुपरस्टार्सच्या वागण्यात झाला बदल? मौसमी चॅटर्जी स्पष्टच बोलल्या

moushumi chatterjee shocking revealation says amitabh bachchan changed after got stardom | "स्टारडम मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांचं वागणं बदललं", मौसमी चॅटर्जींचा खुलासा

"स्टारडम मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांचं वागणं बदललं", मौसमी चॅटर्जींचा खुलासा

अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांनी ८० च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं. त्यांनी जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, धर्मेंद्रसह अनेक सुपरस्टारसह काम केलं. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. स्टारडम मिळाल्यानंतर बिग बी कसे बदलले हे त्यांनी सांगितलं.

आनंद बाजार पत्रिकाशी बातचीत करताना मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, "अमिताभ बच्चन यांनी खूप संघर्ष केला आणि मेहनत करुन ते इतके मोठे स्टार झाले. पण ते चांगल्या कारणासाठी झाले का तर असं मी म्हणणार नाही. जेव्हा तुम्हाला इतकं सगळं मिळतं, तेव्हा तुमची वागणूकही बदलते. तुम्ही दुसऱ्यांची मदत करण्याचा विचारही करत नाही."

अमिताभ बच्चन यांच्या सेटवरील वागणूकीबद्दल त्या म्हणाल्या, "त्यांचा भाऊ अजिताभ त्यांच्यासाठी कारची व्यवस्था करायचा.  सेटवरी ने आण करण्यासाठी कार होती. ते खूपच शांत असायचे, एकटेच बसायचे आणि हेअर ड्रेसर्ससोबतच जेवायचे." याशिवाय सुपरस्टार राजेश खन्नांबद्दलही त्या म्हणाल्या, "त्यांना खूप अहंकार होता. साहजिकच आहे असणार...एवढं यश मिळ्यानंतर ते डोक्यात जाणारच."

मौसमी चॅटर्जींनी अमिताभ यांच्यासोबत 'रोटी कपडा और मकान', 'बेनाम', 'हम कौन है', 'मंजिल' सारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. अगदी काही वर्षांपूर्वी आलेल्या 'पिकू' सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती.  

Web Title: moushumi chatterjee shocking revealation says amitabh bachchan changed after got stardom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.