या आठवड्यात बॉक्सआॅफिसवर रिलीज होणार ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 08:42 PM2018-10-01T20:42:03+5:302018-10-01T20:44:42+5:30

होय, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोन चित्रपट रिलीज होत आहेत. ते म्हणजे, ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’.

movies this week aayush sharmas loveyatri and ayushmann khurranas andhadhun coming to your way | या आठवड्यात बॉक्सआॅफिसवर रिलीज होणार ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’!!

या आठवड्यात बॉक्सआॅफिसवर रिलीज होणार ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’!!

googlenewsNext

दर शुक्रवारी सिनेप्रेमींना नव्या चित्रपटांची प्रतीक्षा असते़ दर शुक्रवारप्रमाणे या शुक्रवारीही नवे चित्रपट बॉक्सआॅफिसवर धडकणार आहेत. होय, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोन चित्रपट रिलीज होत आहेत. ते म्हणजे, ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’.
‘लवयात्री’ या चित्रपटातून सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. त्यामुळे खान फॅमिलीसाठी येता शुक्रवार  महत्त्वपूर्ण असणार आहे. आयुष शर्मासोबतचवरिना हुसैन हिचा सुद्धा हा पहिला चित्रपट आहे. डेब्यू सिनेमा असल्याने तिच्यासाठीही हा शुक्रवार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अभिराज मीनावाला दिग्दर्शित हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. सुश्रूत व मिशेल हे दोघे नवरात्रीत भेटतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण नवरात्रोत्सव संपताच मिशेल लंडनला परत जाते. मिशेलला मिळवण्यासाठी सुश्रूत कुठल्या दिव्यातून जातो, अशी ‘लवयात्री’ची कथा आहे.

‘अंधाधुन’बद्दल सांगायचे तर यात आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे, तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे. चित्रपटातला हिरो आंधळा आहे. पण त्याच्यासोबत अशा काही घटना घडतात की, आपण खरेचं आंधळे आहोत की नाही, हा प्रश्न त्याला स्वत:लाच पडतो. श्रीराम राघवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. श्रीराम राघवन यांनी यापूर्वी वरूण धवनसोबत ‘बदलापूर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
एकंदर काय तर ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’ दोन्ही चित्रपटाच्या निमित्ताने सिनेप्रेमींना दोन परस्पर विसंगत जॉनरचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. आता यापैकी तुम्ही कोणता चित्रपट निवडता, ही चॉईस अर्थातचं तुमची आहे.

Web Title: movies this week aayush sharmas loveyatri and ayushmann khurranas andhadhun coming to your way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.