नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 09:38 AM2024-06-07T09:38:07+5:302024-06-07T09:38:36+5:30
काल चंदीगढ एअरपोर्टवर कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई करण्यात आल्याती बातमी समोर येतेय (kangana ranaut)
काल एका घटनेने सगळीकडे खळबळ माजली. ती म्हणजे नुकतीच खासदार झालेल्या कंगना रणौतला एअरपोर्टवर एका CISF महिला जवानाने कानशिलात लगावली. या घटनेची सर्वत्र खूप चर्चा झाली. कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या घटनेचा सविस्तर खुलासा केला. आता याविषयी मोठी बातमी समोर येतेय. ज्या CISF महिला जवानाने कंगनाला मारलं तिच्यावर मोठी कारवाई झाली असून तिला सस्पेंड करण्यात आलंय.
कंगनाला कानशिलात लगावणारी महिला जवान बडतर्फ
१०० रुपये घेऊन लोक शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत, असं विधान कंगनाने केलं होतं. CISF महिला जवानाची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. कंगनाच्या विधानाने संतप्त झालेल्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. कंगना त्यावेळी चंदीगढ एअरपोर्टवरुन दिल्लीसाठी रवाना होत होती. याचदरम्यान ही घटना घडली. कंगनाने याविषयी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी महिला जवान कुलविंदर कौरवर मोठी कारवाई करत तिला सस्पेंड केलंय.
#KanganaRanaut slapped by a CISF constable, Kulwinder Kaur. She was reportedly upset with Kangana's comments on farmers.
— Roop Darak (Modi Ka Parivar) (@RoopDarak) June 6, 2024
Despicable way of expressing ideological differences, especially when you're wearing a uniform! pic.twitter.com/EH4DRqbKJu
नेमकी घटना काय?
भाजपच्या नवनिर्वाचित खासदार व अभिनेत्री कंगना रणाैतला चंडीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने गुरुवारी कानशिलात लगावली. २०२१ साली झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महिलांना १०० ते २०० रुपये मिळाले होते, असे विधान कंगनाने केले होते. त्यावर संतप्त झालेल्या महिला जवानाने आंदोलनात माझी आईदेखील सहभागी झाली होती, असे म्हणत कंगनाच्या कानशिलात लगावली. सदर महिला ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची समर्थक आहे, त्यामुळे तिने कंगनाविरोधात असं कृत्या केल्याचं ती म्हणाली.