Mr And Mrs Mahi : चाहत्याचा नादच खुळा; जान्हवी कपूरसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:24 PM2024-06-03T13:24:12+5:302024-06-03T13:24:47+5:30

सोलापूरच्या जान्हवीच्या या फॅनची जोरदार चर्चा होतेय.

Mr And Mrs Mahi : The fan of Solapur has booked an entire theater For Janhvi Kapoor | Mr And Mrs Mahi : चाहत्याचा नादच खुळा; जान्हवी कपूरसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक

Mr And Mrs Mahi : चाहत्याचा नादच खुळा; जान्हवी कपूरसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक

Janhvi Kapoor : 'मे तेरा हायरे, जबरा, होय रे जबरा फॅन हो गया...'  जान्हवी कपूरच्या चाहत्यासाठी  हे गाणं एकदम फीट बसतेय. अभिनेत्री जान्हवी कपूरचा मिस्टर अँड मिसेस माही हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी चाहते नेहमीच काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात. अशातच जान्हवीच्या सिनेमासाठी सोलापूरमध्ये एका चाहत्याने संपूर्ण थिएटर बुक केले आहे. 

सोलापूरच्या जान्हवीच्या या फॅनची जोरदार चर्चा होतेय. त्याला जबरा फॅन म्हटलं तर वावगं वाटायला नको. यासाठी त्यानं तब्बल 6 लाख रुपये खर्च केले. धर्मराज गुंडे असं सोलापुरातील जान्हवी कपूरच्या चाहत्याचं नाव आहे. त्यानं जान्हवीच्या सिनेमाचं सोलापूर शहरातील सर्व सामान्य व्यक्तींसाठी मोफत स्क्रिनिंग ठेवलं. 'साम'च्या वृतानुसार धर्मराजने 6 लाख रुपये खर्च करून 18 शो बुक केले होते. या चाहत्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. 


'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमातून एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली आहे. जान्हवी कपूर आणि राजकुमार रावची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून सिनेमाची  बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. या सिनेमाचं निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची आहे. तर शरण शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाशिवाय, जान्हवी ही ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तिनं राम चरणसोबत एक चित्रपटही साइन केलाय.

Web Title: Mr And Mrs Mahi : The fan of Solapur has booked an entire theater For Janhvi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.