Rakesh Kumar passes away : बॉलिवूडमधून आली आणखी एक दु:खद बातमी, ‘मि. नटवरलाल’चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:15 PM2022-11-13T12:15:23+5:302022-11-13T12:20:29+5:30

Mr Natwarlal director Rakesh Kumar passes away : राकेश कुमार दीर्घकाळापासून कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. राकेश  कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Mr Natwarlal director Rakesh Kumar passes away bollywood | Rakesh Kumar passes away : बॉलिवूडमधून आली आणखी एक दु:खद बातमी, ‘मि. नटवरलाल’चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन

Rakesh Kumar passes away : बॉलिवूडमधून आली आणखी एक दु:खद बातमी, ‘मि. नटवरलाल’चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन

googlenewsNext

Mr Natwarlal director Rakesh Kumar passes away : टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं नुकतंच निधन झालं. जिममध्ये वर्कआउट करत असताना या सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्याची प्राणज्योत मालवली. सिद्धांतच्या निधनाच्या दु:खातून मनोरंजन विश्व सावरलं नसताना बॉलिवूडमधून आणखी एक दु:खद बातमी आली. बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राकेश कुमार यांचं गुरूवारी निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. राकेश कुमार दीर्घकाळापासून कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. खून पसीना, दो और दो पांच, मिस्टर नटवरलाल आणि याराना यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या राकेश  कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

 अमिताभ बच्चन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये एक दीर्घ श्रद्धांजली नोट लिहिली आहे. राकेश कुमार यांनी ‘मिस्टर नटवरलाल’या आयकॉनिक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा, कादर खान आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय राकेश कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत  खून पसीना, दो और दो पांच,  कौन जीता कौन हारा  या आणखी तीन चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

दिल तुझको दिया, कमांडर, कौन जिता कौन हारा हे सिनेमे त्यांनी प्रोड्यूस केले होते. काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला होता. राकेश कुमार यांचा शेवटचा सिनेमा ‘सूर्यवंशी’ होता. यात सलमान खानसोबत शीबा, अमृता सिंग, सईद जाफरी मुख्य भूमिकेत होते. 1992 साली आलेला हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला होता.

Web Title: Mr Natwarlal director Rakesh Kumar passes away bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.