श्री रेड्डीने सुपरस्टार पवन कल्याणला दिली ‘ही’ धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 02:40 PM2018-05-03T14:40:08+5:302018-05-03T20:12:43+5:30
तेलगू चित्रपट निर्मात्यांवर सातत्याने कास्टिंग काउचचे आरोप लावणारी अभिनेत्री श्री रेड्डी पुन्हा एकदा वादग्रस्तरीत्या प्रसिद्धीझोतात आली आहे. आता यावेळी ...
त लगू चित्रपट निर्मात्यांवर सातत्याने कास्टिंग काउचचे आरोप लावणारी अभिनेत्री श्री रेड्डी पुन्हा एकदा वादग्रस्तरीत्या प्रसिद्धीझोतात आली आहे. आता यावेळी ती तेलगू सुपरस्टार पवन कल्याण याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पवन कल्याणच्या चाहत्यांकडून सातत्याने श्री रेड्डीला ट्रोल केले जात असल्यानेच तिने हा निर्णय घेतला आहे. जेव्हापासून श्री रेड्डीने कास्टिंग काउचचा मुद्दा उपस्थित करीत पवन कल्याणच्या विरोधात वक्तव्य केले, तेव्हापासूनच पवनच्या चाहत्यांकडून तिला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले जात आहे. हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, श्री रेड्डीने म्हटले की, ‘जर तो त्यांना आवरू शकत नसेल तर मी त्याच्या चाहत्यांविरोधात नव्हे तर त्याच्याविरोधातच कायदेशीर गुन्हा दाखल करणार.’ श्री रेड्डीने एकप्रकारे ही धमकीच दिली असून, पवन कल्याण त्याकडे कशापद्धतीने बघतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, श्री रेड्डीच्या अर्धनग्न आंदोलनावर प्रतिक्रिया देताना पवन कल्याणने म्हटले की, तिने अशाप्रकारचे आंदोलन केल्यापेक्षा कायद्याचा आधार घ्यायला हवा होता. मात्र पवन कल्याणचा हा सल्ला तिला अजिबातच भावला नसल्याने तिने अतिशय अल्पशब्दात त्याला सुनावले होते. तसेच त्याच्यासमोरच स्वत:ला चप्पलने मारहाणही केली होती. श्री रेड्डीच्या या वागणुकीनंतर पवन कल्याणच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे पवन कल्याणने त्याच्या चाहत्यांना शांत राहण्यास न सांगता स्वत: त्यांना एकप्रकारे भडकविण्याचाच प्रयत्न केला.
ALSO READ : अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रीला सुपरस्टार पवन कल्याणने दिला ‘हा’ सल्ला!
दरम्यान, हे सर्व प्रकरण ७ एप्रिल रोजी समोर आले. जेव्हा श्री रेड्डीने तेलगू फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयासमोरच निर्वस्त्र होत आंदोलन केले होते. त्याचबरोबर तिने अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांवर अतिशय खळबळजनक आरोपही केले होते. श्री रेड्डीच्या या आरोपामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.