अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या श्री रेड्डीने आता सुपरस्टार महेश बाबूवर साधला निशाणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 10:06 AM2018-05-03T10:06:00+5:302018-05-03T15:36:00+5:30
तेलगू चित्रपटसृष्टीत त्यावेळी खळबळ उडाली जेव्हा श्री रेड्डीने भर रस्त्यात कास्टिंग काउचविरोधात आवाज उठविण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर कास्टिंग ...
त लगू चित्रपटसृष्टीत त्यावेळी खळबळ उडाली जेव्हा श्री रेड्डीने भर रस्त्यात कास्टिंग काउचविरोधात आवाज उठविण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर कास्टिंग काउचचा मुद्दा असा काही पेटला की, त्याच्या झळा आता बॉलिवूडलाही बसत आहेत. श्री रेड्डीच्या या विचित्र आंदोलनानंतर ती लाइमलाइटमध्ये आली. आता तर तिने साउथचा सुपरस्टार महेश बाबूच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर असे काही वक्तव्य केले, ज्यामुळे महेश बाबूचा चांगलाच संताप होऊ शकतो.
महेश बाबूच्या ‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स आॅफिसवर धमाकेदार कमाई केली. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा ओढा सुरूच आहे. परंतु त्याचदरम्यान श्री रेड्डीने चित्रपटाबद्दल एक मोठे वक्तव्य केल्याने एकच चर्चा रंगली आहे. श्री रेड्डीने ट्विटरवर तेलगू भाषेत बºयाचशा पोस्ट करताना चित्रपटाला ओवररेटेड म्हटले. श्री रेड्डीने म्हटले की, ‘महेश बाबूच्या स्टारडममुळेच हा चित्रपट हिट झाला. चित्रपटात त्याचा अभिनय एक्सप्रेशनलेस आहे.’
त्याचबरोबर श्री रेड्डीने हेदेखील म्हटले की, ‘दिग्दर्शक कोराटाला सिवाचा हा चित्रपट म्हणजे आतापर्यंतचे त्यांचे सर्वात वाईट काम आहे. चित्रपटाची कथा कुचकामी आहे. वास्तविक श्री रेड्डीने काही वेळानंतर तिचे हे ट्विट डिलीट केले. दरम्यान, श्री रेड्डीने बºयाचशा निर्मात्यांवर कास्टिंग काउचचे आरोप केले आहेत. ज्यामध्ये कोराटाला सिवा यांच्या नावाचाही समावेश आहे. जेव्हा श्री रेड्डीने त्यांच्या विरोधात आरोप केले होते, तेव्हा त्यांनी एका व्हिडीओ मॅसेजद्वारे आपले मत मांडताना मी कास्टिंग काउचच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. वास्तविक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कलाकार जाणून आहे की, ते अभिनेत्रींचा किती आदर्श करतात.
दरम्यान, श्री रेड्डीने अर्धनग्न आंदोलन करताना तेलगू इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे नाव घेतले होते. तसेच अनेक दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. श्री रेड्डीने भर रस्त्यात अर्धनग्न होत कास्टिंग काउचविरोधात आंदोलन केले होते. श्री रेड्डीच्या या आंदोलनानंतर चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.