महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे! राणी मुखर्जी तिच्या ७ वर्षांची लेकीला शिकवतेय मराठी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 06:00 PM2023-04-07T18:00:59+5:302023-04-07T18:02:01+5:30

अलिकडेच राणी मुखर्जी करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट या शोमध्ये आली होती. यावेळी तिने हा खुलासा केला.

Mrs chatterjee vs norway actress rani mukerji reveals that adira chopra is learning marathi language | महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे! राणी मुखर्जी तिच्या ७ वर्षांची लेकीला शिकवतेय मराठी

महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे! राणी मुखर्जी तिच्या ७ वर्षांची लेकीला शिकवतेय मराठी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचा हा चित्रपट  लोकांनाही खूप आवडला आहे. बॉलिवूड स्टार्सपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. राणी ही आपलं वैयक्तिक  आणि व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवते. त्याने अलिकडेच आपली मुलगी आदिराबद्दल एका मुलाखतीत सांगिताना म्हणाली, ती तिला मुलीला मराठी भाषा शिकवते आहे. 

अलिकडेच अभिनेत्री करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट या शोमध्ये आली होती. यात तिला करिनाने आदिराच्या शिक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना राणी म्हणाली- 'मला आदिराला वेगवेगळ्या भाषा शिकवायच्या आहेत. मला तिला शाळेत शिकलेल्या भाषेपेक्षा वेगळी भाषा शिकवायची आहे जेणेकरून ती जगात कुठेही गेली तरी तिला त्या भाषेत बोलता येईल.. पण सर्वप्रथम तिने शुद्ध हिंदी बोलायला आणि लिहायला शिकावे अशी माझी इच्छा आहे. अभिनेत्रीने सांगितले की, आदिरा खूप हुशार आहे, ती शाळेत इंग्रजीसोबतच हिंदीही चांगली शिकत आहे. खरं तर, ती तिच्या वर्गातली एकमेव मुलगी आहे जी चांगली हिंदी बोलते.

राणी पुढे असे ही म्हणाली, ती मराठीही शिकत आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे तिला ही भाषा येणं सर्वात महत्त्वाचे आहे. राणी आणि आदित्य चोप्रा यांची मुलगी आदिरा 7 वर्षांची आहे. अभिनेत्रीने तिला लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे.

करीना कपूरशी बोलताना, राणी म्हणाली, मी माझ्या मुलीला इतक्या वर्षांत मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाले. यावर करीना म्हणाली की हे करण्यासाठी नक्कीच सुपर पॉवरची गरज आहे, तेव्हा राणी म्हणाली की नाही, सुपर पॉवर नाही. मी त्यांना (पापाराझी) खूप प्रेमाने सांगितले की कृपया मुलीचे फोटो काढू नका आणि त्यांनीही होकार दिला.

Web Title: Mrs chatterjee vs norway actress rani mukerji reveals that adira chopra is learning marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.