तेलगू अभिनेत्यासोबतच्या लग्नाच्या अफवांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली - "तुम्ही सांगा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 11:16 AM2023-11-04T11:16:46+5:302023-11-04T11:17:08+5:30

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत आली आहे. नुकतीच तिच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

Mrunal Thakur breaks silence on marriage rumors with Telugu actor, says - "You tell me..." | तेलगू अभिनेत्यासोबतच्या लग्नाच्या अफवांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली - "तुम्ही सांगा..."

तेलगू अभिनेत्यासोबतच्या लग्नाच्या अफवांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली - "तुम्ही सांगा..."

अभिनेत्री मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)च्या चाहत्यांची कमी नाही. सोशल मीडियापासून ते चित्रपटांपर्यंत चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. अलीकडेच मृणालच्या लग्नाबाबत अशी अफवा पसरली होती की अभिनेत्री एका तेलुगु अभिनेत्याशी लग्न करणार आहे. मात्र आता या वृत्तावर मृणालने मौन सोडले आहे.

व्हिडिओ शेअर करताना मृणालने म्हटले की, 'मित्रांनो, तुमचे हृदय तोडताना मला खूप वाईट वाटते. सर्व स्टायलिस्ट, डिझायनर, मित्र आणि कुटूंबियांना जे गेल्या तासाभरापासून मला सतत फोन करत आहेत जेव्हा त्यांना कळले की मी एका तेलगू मुलाशी लग्न करत आहे. मला पण जाणून घ्यायचे आहे की हा मुलगा कोण आहे? दुसरे म्हणजे, ही खोटी अफवा आहे याबद्दल मला खेद वाटतो.

'तुम्ही सांगा कुठे यायचं'
पुढे, अभिनेत्री गमतीने म्हणाली, 'तुम्हाला माझ्यासाठी मुलगा सापडला तर मला कळवा मी येईन. ही अफवा किती मजेदार आहे हे मी सांगू शकत नाही. मला कंट्रोल करता आले नाही. लग्न लवकरच होईल, मुलगा स्वतः शोधा, ठिकाण सांगा, व्हेन्यू सर्व काही पाठवा.

अल्लू अरविंद यांनी अलीकडेच मृणालला लवकरच लग्न करण्याचे आशीर्वाद दिले होते. यानंतर अभिनेत्री मृणाल लवकरच लग्न करणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. मात्र, व्हिडिओ शेअर केल्यानंतर मृणालने आता हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ही बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्रीचे अनेक चाहते दु:खी झाले आहेत.

Web Title: Mrunal Thakur breaks silence on marriage rumors with Telugu actor, says - "You tell me..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.