Mrunal Thakur : मृणालचा एक्सबॉयफ्रेंड पळून गेला! म्हणाली, "तो जुन्या विचारांचा होता अन् त्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:11 AM2023-05-31T10:11:21+5:302023-05-31T10:12:04+5:30

मृणाल ठाकुर मूळची धुळ्याची असून तिने मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात नाव कमावलं आहे.

mrunal thakur ex boyfriend ran off he was old school and didnt like her impulsive behaviour | Mrunal Thakur : मृणालचा एक्सबॉयफ्रेंड पळून गेला! म्हणाली, "तो जुन्या विचारांचा होता अन् त्याला..."

Mrunal Thakur : मृणालचा एक्सबॉयफ्रेंड पळून गेला! म्हणाली, "तो जुन्या विचारांचा होता अन् त्याला..."

googlenewsNext

अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) 'सीतारामम' सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर जादूच केली. सिनेमात तिने केलेला उत्तम अभिनय आणि निरागस सौंदर्य भुरळ पाडणारंच होतं. मृणालने नुकतेच कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्येही पदार्पण केलं. तिच्या लुकचं खूपच कौतुक झालं. मृणालचं करिअर सध्या भरारी घेत असतानाच तिने एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलास संवाद साधला.

मृणाल ठाकुर मूळची धुळ्याची असून तिने मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात नाव कमावलं आहे. दमदार भूमिका करत तिने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे. युट्यूबर रणवीर अहलाबादियाच्या चॅटशोमध्ये मृणालला आयुष्यात कोणी बॉयफ्रेंड आहे का किंवा होता का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मृणाल म्हणाली, "माझा बॉयफ्रेंड पळून गेला होता. मी खूपच इम्पल्सिव्ह आहे. त्यात अभिनेत्रीही आहेस. त्याला या गोष्टी मान्य नव्हत्या. तो थोडा जुन्या विचारांचा होता. त्यात त्याची चूक नाही कारण त्याला घरातूनच तसे संस्कार मिळाले होते. पण आमचं नातं संपलं ते बरंच झालं कारण उद्या माझ्या मुलांचं त्याचपद्धतीने पालनपोषण झालं असतं तर ते मला चाललं नसतं."

मृणाल ठाकूर नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलवरुन परत आली आहे. तसंच तिचा आदित्य रॉय कपूरसोबत गुमराह सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. आता मृणाल लवकरच तेलुगू सिनेमा 'नानी 30'मध्ये दिसणार आहे. याचं शूटिंग नुकतंच संपलं आहे.

Web Title: mrunal thakur ex boyfriend ran off he was old school and didnt like her impulsive behaviour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.