"एक लाजरा न साजरा मुखडा...", 49 वर्ष जुन्या गाण्यावर मृणाल ठाकूरचा मराठमोळा अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 01:15 PM2024-09-23T13:15:08+5:302024-09-23T13:15:52+5:30

मृणाल हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mrunal Thakur Shares Instagram Story On Marathi Song Ek Lajara Na Sajara Mukhda | "एक लाजरा न साजरा मुखडा...", 49 वर्ष जुन्या गाण्यावर मृणाल ठाकूरचा मराठमोळा अंदाज!

"एक लाजरा न साजरा मुखडा...", 49 वर्ष जुन्या गाण्यावर मृणाल ठाकूरचा मराठमोळा अंदाज!

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी टीव्हीपासून सुरुवात केली आणि बॉलिवूडमध्ये मोठे स्थान मिळवले. या यादीत अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या नावाचाही समावेश आहे. आज मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही स्वत:चे नाव कमावले आहे.  मूळची धुळ्याची असलेल्या मृणालचं मराठी प्रेम कायम दिसून येतं.  मृणाल हिला उत्तम मराठी बोलताही येतं आणि खूप गोड ती गातेही. अशातच मृणालने मराठी गाणं गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नुकतंच मृणाल ठाकूरचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. मृणाल हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती 49 वर्ष जुनं "एक लाजरा न साजरा मुखडा..." हे गाणं तिच्या गोड आवाजात गाताना दिसतेय. मृणालाला तिची टीमही दिलं साथ देताना दिसून येतेय. तिचा हा अंदाज चाहत्यांना पसंत आला आहे. 

मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. विविध पोस्टद्वारे मृणाल चाहत्यांच्या तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल अपडेट देत असते. काही दिवसांपुर्वी मृणाल ही 'तांबडी चामडी'  हे गाणं गाताना दिसून आली होती. एवढंच काय तर एका हाताचं बोट वर करून बसल्या जागीच मृणाल नाचताना  पाहायला मिळाली होती.


मृणाल ठाकूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, मृणाल अलीकडेच विजय देवरकोंडासोबत 'द फॅमिली स्टार' चित्रपटात दिसली होती..  मृणाल ठाकूरने २०२२ मध्ये 'सीता रामम' या तेलगू चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 'सीता रामम' नंतर लोक मृणालला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हणू लागले. आता ती आगामी 'विश्वंभरा' सिनेमात झळकणार आहे. यामध्ये चिरंजीवी, तृषा कृष्णन यांचीही भूमिका आहे. 

Web Title: Mrunal Thakur Shares Instagram Story On Marathi Song Ek Lajara Na Sajara Mukhda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.