मित्रा लय भारी राव... मृणाल ठाकूरला पडली 'तांबडी चामडी' गाण्याची भुरळ, पोस्ट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 04:26 PM2024-09-10T16:26:57+5:302024-09-10T16:29:00+5:30

'तांबडी चामडी'ने जवळपास सगळेच रेकॉड्स तोडले होते. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून अनेकजण थिरकताना दिसतायंत.

Mrunal Thakur shares instagram story on trending marathi song Taambdi Chaamdi | मित्रा लय भारी राव... मृणाल ठाकूरला पडली 'तांबडी चामडी' गाण्याची भुरळ, पोस्ट करत म्हणाली...

मित्रा लय भारी राव... मृणाल ठाकूरला पडली 'तांबडी चामडी' गाण्याची भुरळ, पोस्ट करत म्हणाली...

सध्या सोशल मीडियावर एकाच गाण्याची चर्चा सुरु आहे. ते गाणं म्हणजे 'तांबडी चामडी' (Taambdi Chaamdi).  या मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय. 'तांबडी चामडी'ने जवळपास सगळेच रेकॉड्स तोडले होते.  हे मराठी गाणंही रसिकांच्या पसंतीस उतरतंय. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून अनेकजण थिरकताना दिसतायंत. आता या गाण्याची भुरळ अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही पडल्याचं पाहायला मिळालं. 

 मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. विविध पोस्टद्वारे मृणाल चाहत्यांच्या तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल अपडेट देत असते. नुकतंच मृणाल ठाकूरने 'तांबडी चामडी' या गाण्यावर इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. तिच्या या स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये मृणाल ही कारमध्ये बसलेली असून "मला खूप गोष्टी करायच्या आहेत, पण मी त्या करू शकत नाही", असं म्हणते. यानंतर लगेच ती  'तांबडी चामडी चमकते उन्हात लक लक लक' हे गाणं गाताना दिसतेय. 


एवढचं नाही तर एका हाताचं बोट वर करून बसल्या जागीच नाचतना मृणाल पाहायला मिळतेय. यावरुन मृणालला 'तांबडी चामडी' हे गाणं फारच आवडल्याचं दिसून येतंय. मृणालची ही स्टोरी डीजे क्रेटेक्स आणि श्रेयस सागवेकर यांनी पोस्ट केली आणि तिचे आभार मानले आहेत. मृणालनेदेखील "तुम्ही एकदम सर्वोत्कृष्ट आहात! मित्रा लय भारी राव" अशी कमेंट करत दोघांच कौतुक केलं. 

तांबडी चामडी हे गाणं श्रेयस सागवेकर याने लिहिलं असून कृणाल घोरपडेने ते संगीतबद्ध केलं आहे. आता तांबडी चामडी हे गाणे फक्त भारतात नव्हे तर जगभरात गाजतेय.  स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या ऑफिशल चॅनेलवर ‘तांबडी चामडी’ हे गाणं प्रदर्शित झाल आहे. त्यामुळे जगभरातील लोक हे मराठी गाणं आता बघू आणि ऐकू शकणार आहेत.

Web Title: Mrunal Thakur shares instagram story on trending marathi song Taambdi Chaamdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.