Mrunal Thakur च्या मनात येत होते आत्महत्येचे विचार, लोकल ट्रेनमधून मारणार होती होती; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:36 PM2022-02-11T17:36:40+5:302022-02-11T17:40:52+5:30

Mrunal Thakur : कमी वेळातच तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात तिला फार अडचणींचा सामना करावा लागला. त्या गोष्टींचा खुलासा स्वत: मृणालने केला आहे.

Mrunal Thakur talks about suicidal thoughts when she would feel jumping off Mumbai local train | Mrunal Thakur च्या मनात येत होते आत्महत्येचे विचार, लोकल ट्रेनमधून मारणार होती होती; कारण...

Mrunal Thakur च्या मनात येत होते आत्महत्येचे विचार, लोकल ट्रेनमधून मारणार होती होती; कारण...

googlenewsNext

runal Thakur : मृणाल ठाकूर तिच्या आगामी 'जर्सी' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची रिलीज डेट कोरोनामुळे पुढे ढकलली होती. मृणाल ‘सुपर 30’, ‘धमाका’ आणि ‘तूफान’ सारख्या सिनेमात दिसली होती. कमी वेळातच तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात तिला फार अडचणींचा सामना करावा लागला. त्या गोष्टींचा खुलासा स्वत: मृणालने केला आहे.

मृणाल ठाकूरने एका मुलाखतीत खुलासा केला की, कशाप्रकारे क्राइम जर्नलिझममध्ये तिला आपलं करिअर करायचं होतं आणि कसं तिला टेलिव्हिनजवर यायचं होतं. पण पालकांना वाटत होतं की, तिने डेंटिस्ट बनावं मृणाल म्हणाली की, कशाप्रकारे तिने ऑडिशन दिले. तिला असं वाटत होतं की,  आता तिच्या जीवनात पुढे काहीच होणार नाही.

मृणाल ठाकूरने यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियासोबत बोलताना सांगितलं की, 'खूपसाऱ्या जबाबदाऱ्याही होत्या. त्यावेळी मी विचार करत होते की, जर मी चांगलं काम केलं नाही तर मला पुन्हा काम मिळणार नाही. मी विचार केला होता की, २३ वयात माझं लग्न होईल, त्यानंतर मुलं होतील आणि हेच मला नको होतं. मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि तेव्हा मी ऑडिशन देत होते'.

मृणाल ठाकूरने पुढे म्हणाली की, 'एक वेळ अशी आली होती की, मला वाटायचं मी कोणत्याच गोष्टीसाठी बनलेली नाही. मी लोकल ट्रेनने प्रवास करत होते. मी दरवाज्यावर उभी राहत होते आणि कधी कधी तर माझं मन करत होतं की, मी उडी मारावी'. ती म्हणाली की, मुंबईत एकटं राहणं  सोपं नाही.

मृणाल म्हणाली की, 'जेव्हा तुम्ही एखादा कोर्स निवडता तेव्हा ते बाहेरून फार मजेदार वाटतं. पण जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत याची जाणीव होत नाही की, तुम्ही यासाठी तयार झालेले नाहीत. हे काहीतरी वेगळं आहे. माझ्यासोबत तेच होत होतं. मी एक क्रिएटिव्ह पर्सन आहे. मी स्क्रीप्ट लिहू शकत नाही. साहित्य नावाचा एक विषय होता. मला अभ्यास आवडत नाही. मी एक श्रोता आहे. मला गोष्टी बघणं आवडतं'.

ती म्हणाली की, 'मी कशासाठी तयार झाले हा एक मोठा प्रश्न होता. मी माझ्या परिवारापासून दूर राहत होते. १७-१८ वर्षाच्या वयात मुंबईसारख्या शहरात राहणं सोपं नाहीये. तुम्हाला तुमच्या भाड्याचं आणि खाण्याचं लक्ष ठेवावं लागतं. तुम्हाला एक एक रूपयाचा हिशेब द्यावा लागेल. कारण माझे वडील एक बॅंकर आहेत,  मी माझ्या खात्यातून ५०० रूपयेही काढले तर त्यांना कळेल'.
 

Web Title: Mrunal Thakur talks about suicidal thoughts when she would feel jumping off Mumbai local train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.