आजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न
By गीतांजली | Published: September 30, 2020 07:44 PM2020-09-30T19:44:55+5:302020-09-30T20:03:55+5:30
आजच्या दिवशी 30 सप्टेंबरला चार वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूतचा 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमा रिलीज झाला होता.
आजच्या दिवशी 30 सप्टेंबरला चार वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूतचा 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमा रिलीज झाला होता. सुशांत तर आज आपल्यासोबत नाही, पण त्याच्या भूमिकांच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील.
धोनीला विचारले होते सुशांतने 250 प्रश्न
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतने क्रिकेटरच्या भूमिकेत स्वत:ला तयार करण्यासाठी एम.एस धोनीला 10-20 नाही तर तब्बल 250 प्रश्न विचारले होते. रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान सुशांतने हा खुलासा केला होता. त्याने सांगितले की, 12 महिन्यांच्या तयारीत मी फक्त धोनीला 3 वेळाच भेटलो. पहिल्या भेटीत सुशांतने धोनीला त्याची कहाणी विचारली होती. दुसऱ्या भेटीत सुशांतने त्याच्यासमोर 250 प्रश्नांची लिस्ट ठेवली होती. यामागचे कारण म्हणजे सुशांतला क्रिकेटरच्या मनातले विचार जाणून घ्यायचे होते जेणेकरुन तो आपल्या अभिनयात ते उतरवू शकेल.
सुशांतने धोनी सिनेमात काम करण्यासाठी किती मेहनत घेतली होती हे सगळ्यांच माहिती आहे. जवळपास सुशांत दीड वर्षे कठोर परिश्रम घेत होता. धोनीच्या बायोपिकसाठी सुशांत मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये रोज प्रॉक्टिस करायचा.
बॉलिवूडमधील उगवत्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुशांत सिंह राजपूतने जून महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी सीबीआय-एनसीबी आणि ईडी करतेय.
व्हिसेरा रिपोर्टमधून होणार मोठा खुलासा?
सुशांतसिंग राजपूत प्रकरणी एम्सच्या टीमने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? याचे उत्तर या अहवालातून मिळणे अपेक्षित आहे. सूत्रांचे मानाल तर सुशांतला विष देण्यात आले नव्हते. सुशांतच्या शरीरात कोणतेही विष सापडले नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आता एम्सच्या अहवालावर सीबीआय अंतिम निर्णय घेईल. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे राहिले नाही, असा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी केला होता. आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील.
सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला...! बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप
Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर