Birthday Special : मुकेश भट यांनी सनी लिओनीबद्दल केले होते हे वादग्रस्त विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 10:55 AM2019-06-05T10:55:44+5:302019-06-05T10:56:25+5:30
बॉलिवूडचे दिग्गज निर्माते मुकेश भट आज (५ जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. मुकेश यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. ५ जून १९५२ रोजी जन्मलेले मुकेश चित्रपटांसोबत आपल्या परखड वक्तव्यांसाठीही ओळखले जातात.
बॉलिवूडचे दिग्गज निर्माते मुकेश भट आज (५ जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. मुकेश यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. ५ जून १९५२ रोजी जन्मलेले मुकेश आपल्या चित्रपटांसोबत आपल्या परखड वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. याशिवाय अनेक नव्या चेहºयांना ब्रेक देणारे निर्माते अशीही त्यांनी ओळख आहे. इमरान हाश्मी, कंगना राणौत, इशा गुप्ता अशा अनेकांना मुकेश यांनी ब्रेक दिला.
आपल्या तिखट वक्तव्यांमुळे ते अनेकदा वादात सापडले. सनी लिओनीबद्दल त्यांनी केलेल्या विधानाची तर प्रचंड चर्चा झाली होती. सनी लिओनीचे चित्रपट चित्रपटगृहात दाखवले जात असताना तुम्ही राष्ट्रगीत कसे काय वाजवू शकता? असा सवाल त्यांनी केला होता. विशेष म्हणजे, मुकेश भट यांचे बंधू महेश भट यांनीच सनी लिओनीला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता.
महिलांबद्दलही त्यांचे एक विधान चांगलेच वादग्रस्त ठरले होते. महिला दाखवतात तितक्या निष्पाप व साध्याभोळ्या नसतात, असे त्यांनी म्हटले होते. २०१७ मध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीकडे कास्टिंग काऊचचा मुद्दा गरम असताना मुकेश यांनी या मुद्यावर वादग्रस्त विधान केले होते. फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष या नात्याने त्यांना कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आले होते. यावर बोलताना, आम्ही यावर काय करू शकतो? कुठलीही मुलगी कास्टिंग काऊचची शिकार ठरू नये, यासाठी प्रत्येक फिल्म मेकरच्या ऑफिसबाहेर मोरल पोलिस तैनात तर करू शकत नाही ना,असे ते म्हणाले होते. महिला दिसतात तितक्या साध्याभोळ्या नसतात. पुरूषांप्रमाणे शोषण करणा-या महिलाही या समाजात आहेत, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर प्रचंड टीका झाली होती.
मुकेश भट महेश भट यांचे भाऊ आहेत. त्यांनी १९९० मध्ये पहिल्यांदाच विनोद खन्ना स्टारर ‘जुर्म’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी गुलशन कुमारसोबत मिळून ‘आशिकी’ प्रोड्यूस केला. पुढे दिल है की मानता नहीं, नाजायज, गुलाम आणि संघर्ष असे अनेक चित्रपट त्यांनी प्रोड्यूस केलेत.