Throwback : -अन् भट कॅम्पने चक्क मनीषा कोईरालाच्या मृत्यूची बातमी छापून आणली...! वाचा, किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 08:00 AM2022-10-29T08:00:00+5:302022-10-29T08:00:02+5:30

Manisha Koirala : 28 वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मात्र चक्क हिरोईनच्या मृत्यूची बातमी छापली गेली होती. वाचून धक्का बसेल, पण हे खरं आहे...

Mukesh Bhatt had printed to make a hit, the news of Manisha Koirala’s death | Throwback : -अन् भट कॅम्पने चक्क मनीषा कोईरालाच्या मृत्यूची बातमी छापून आणली...! वाचा, किस्सा

Throwback : -अन् भट कॅम्पने चक्क मनीषा कोईरालाच्या मृत्यूची बातमी छापून आणली...! वाचा, किस्सा

googlenewsNext

चित्रपट हिट होण्यासाठी चांगली कथा, चांगले कलाकार, चांगला दिग्दर्शक, सुंदर-श्रवणीय गाणी, संवाद अशा कितीतरी गोष्टी आवश्यक मानल्या जातात. याशिवाय आणखी एक गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. ती म्हणजे प्रमोशन. खरं तर सुरूवातीपासूनच चित्रपटांना प्रमोट करण्याचा ट्रेंड सुरू आहे. आधी मेकर्स आपल्या चित्रपटाचे मोठमोठे पोस्टर, बॅनर छापून ते बस-रिक्षा, टेम्पोच्या मागे लावायचे. भिंती रंगवायचे. काळासोबत प्रमोशनही बदललं. आताश: प्रमोशनसाठी वेगळा बजेट असतो. कोट्यवधी रूपये प्रमोशनवर खर्च होतात. फर्स्ट लुकपासून टीझर, ट्रेलर रिलीज केला जातो. चित्रपटाचे कलाकार वेगवेगळ्या शोमध्ये जातात. वेगवेगळ्या शहरात प्रत्यक्ष भेटी देऊन प्रमोशन करतात. 28 वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मात्र चक्क हिरोईनच्या मृत्यूची बातमी छापली गेली होती. वाचून धक्का बसेल, पण हे खरं आहे.

या चित्रपटाचं नाव होतं ‘क्रिमिनल’ आणि चित्रपटाची लीड हिरोईन होती मनीषा कोईराला (Manisha Koirala).  तेलगू आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी हा चित्रपट बनत होता. मनीषा कोईरालासोबत नागार्जुन, राम्या कृष्णा हेही या सिनेमा होते. मुकेश भट (Mukesh Bhatt) यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला होता आणि महेश भट (Mahesh Bhatt) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.  हा सिनेमा 60च्या दशकात अमेरिकन टेलिव्हिजनवर आलेल्या ‘द फजीटीव्ह’ या मालिकेवर आधारीत होता. एका डॉक्टरवर पत्नीच्या हत्येचा आरोप होतो. काही वर्षानंतर या आरोपातून तो निर्दोष सुटतो आणि दुसरं लग्न करतो, अशी ही कथा. हिंदीत ‘क्रिमिनल’ या नावानं बनवलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेकर्सनी तगडी प्लानिंग केली होती. सिनेमाची गाणी आधीच मार्केटमध्ये आली होती.

 4 ऑगस्ट 1995 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण या सिनेमाचं  खूपच थंड प्रतिसाद मिळाला. भट कॅम्पला हा फार मोठा धक्का होता. अतिशय जोरात प्रमोशन करूनही देखील हा चित्रपट फ्लॉप होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. अशात त्यांनी एका फंडा वापरला. फंडा काय तर फेक न्यूजचा.
होय, ‘क्रिमिनल’  प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांनी मुंबईसह देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज झळकली. या बातमीने संपूर्ण देशात जणू भूकंप आला. त्यावेळी न्यूज चॅनलचा सुळसुळाट नव्हता. सोशल मीडिया, मोबाईलही नव्हता. त्यामुळे  फक्त प्रिंट मीडिया ही बातमी उमटली.वर्तमानपत्रांनी चौकटीत बातमी छापली.  खालच्या बाजूला अगदी बारीक अक्षरांमध्ये ‘जाहिरात’ असं लिहिलं होतं. पण त्याकडे फारसं लक्ष जाणार नव्हतंच. कारण बातमीच तशी होती. ‘मनीषा कोईरालाचा राहत्या घरी खून...,’ अशी ही बातमी होती. देशात सगळीकडे मनीषा कोइराला च्या मृत्यूची बातमी पसरली. 

लोकांचाही या बातमीवर चटकन विश्वास बसला कारण, ‘बॉम्बे’ हा सिनेमा  प्रदर्शित झाल्यानंतर मनीषाला तशाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. तिने रीतसर पोलीस तक्रार करून संरक्षण मागून घेतलं होतं. त्यामुळे मनीषाच्या हत्येची बातमी अनेकांनी खरी मानली होती. मनीषाच्या घरचे फोन सतत खणखणू लागले. आपल्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रात बघून खुद्द मनीषालाही धक्का बसला. ही बातमी भट कॅम्पकडून जाहिरातीच्या स्वरूपात दिली गेली होती. पण काही काळातच ही बातमी खोटी आहे हे लोकांच्या लक्षात आलं. भट कॅम्पने केलेला बनाव लोकांच्या लक्षात आला. एकीकडे या फेक न्यूजमुळे भट कॅप्शनची इज्जत गेली आणि दुसरीकडे सिनेमाही आपटला...

Web Title: Mukesh Bhatt had printed to make a hit, the news of Manisha Koirala’s death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.