'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 09:48 AM2024-11-14T09:48:14+5:302024-11-14T09:49:01+5:30

रणवीर त्यांच्याकडे आला होता तेव्हा काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे.

Mukesh Khanna opposed Ranveer Singh for Shaktimaan role gives reason | 'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."

'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."

90 च्या दशकातील लहान मुलांचा आवडता शो म्हणजे 'शक्तिमान'(Shaktimaan) . शक्तिमान म्हटलं की अनेकांच्या तोंडांवर त्याचं म्युझिकही येतं. अभिनेते मुकेश खन्नांनी (Mukesh Khanna)  'शक्तिमान'ची भूमिका साकारली होती. ते लहान मुलांचे आवडते अभिनेते बनले होते. काही दिवसांपूर्वी 'शक्तिमान'वर सिनेमा येणार अशी चर्चा झाली. त्यात रणवीर सिंह (Ranveer Singh) 'शक्तिमान'ची भूमिका करणार हेही समोर आलं. मात्र मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंहला विरोध केला. रणवीर त्यांच्याकडे आला होता तेव्हा काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे.

'शक्तिमान' वर सिनेमा आणायचा असेल तर कोण भूमिका करणार याचा निर्णय मेकर्स घेतात. मात्र मुकेश खन्नांनी रणवीर सिंहच्या नावाला कडाडून विरोध केला होता. ते म्हणाले, "हे काही मोठ्या अभिनेत्याबद्दल नाही तर  हे शक्तिमानची भूमिका करण्याबाबत आहे. रणवीर या भूमिकेसाठी माझ्याकडे आला होता. माझं मन वळवण्यासाठी तो आला होता. २ तास आम्ही बोललो.  रणवीरच्या उत्साहाचं कौतुकच आहे आणि तो चांगला अभिनेताही आहे पण मी माझ्या मतावर ठाम होतो."

मुकेश खन्ना यांनी अक्षय कुमारच्या पृथ्वीराज चौहान भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तो पृथ्वीराज वाटला नाही कारण नुसतं मिशा लावून आणि विग घालून कोणी पृथ्वीराज  चौहान होऊ शकत नाही. अभिनेत्याचं व्यक्तिमत्व त्या भूमिकेला अनुकूल असलं पाहिजे."

दुसरीकडे मुकेश खन्ना स्वत:च 'शक्तिमान' च्या रुपात परत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या लूकची झलक दाखवली. मात्र नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलच केलं. 'पोट पुढे असलेला शक्तिमान कसा असेल, आमचं बालपण गेलं पण याचं अजून जात नाही' अशा कमेंट्स त्यांच्या लूकवर आल्या.

Web Title: Mukesh Khanna opposed Ranveer Singh for Shaktimaan role gives reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.