शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 01:22 PM2021-07-25T13:22:12+5:302021-07-25T13:23:03+5:30

Raj Kundra Pornography Case : मुद्दा कुठलाही असो अभिनेते मुकेश खन्ना अगदी परखड बोलतात. आता मुकेश खन्ना यांनी राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

mukesh khanna reacts on raj kundra pornography case says shilpa shetty must come out | शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री शिल्पा शेट्टीची  पती राज कुंद्राच्या अटकेनंतर कसून चौकशी करण्यात आली. राज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

मुद्दा कुठलाही असो अभिनेते मुकेश खन्ना अगदी परखड बोलतात. आता मुकेश खन्ना यांनी राज कुंद्रा(Raj Kundra) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलताना मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी शिल्पा शेट्टीवर (Shilpa Shetty)मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नव-याचे कारनामे बायकोला माहित नाही, हे शक्यचं नाही. शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहिती असणार, असा दावा त्यांनी केला आहे.
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले. राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही सहभाग असू शकतो का? फक्त राज कुंद्राची पत्नी असल्यामुळं शिल्पाला टार्गेट केलं जातंय, हे योग्य आहे का? असं विचारलं असता मुकेश खन्ना म्हणाले, ‘मी राज कुंद्राला कधीही भेटलेलो नाही. पण या प्रकरणावर इंडस्ट्रीतलं कोणीही बोलायला तयार नाही. इंडस्ट्री सोडा राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिनंही का बोलू नये? पतीच्या कारनाम्याबद्दल माहिती असणारी ती पहिली व्यक्ती असणार. ती का बोलत नाहीये? पती काय करतो, हे तिला माहिती नसणार, हे शक्य नाही. आज कोणीही सती-सावित्री नाही, जी पडद्यात बसते. शिल्पा व राज कुंद्रात कसं नातं होतं, यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. पण शिल्पाला 120 टक्के माहित असणार. शिल्पा जबाबदार आहे, असं मी म्हणत नाही. पण ती खरी असेल आणि तिच्यात हिंमत असेल तर तिनं बोलायला हवं. कारण तुम्ही बोललात तर ही अश्लिल इंडस्ट्री बंद होईल.’

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची  पती राज कुंद्राच्या अटकेनंतर कसून चौकशी करण्यात आली. राज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.  शुक्रवारी उशीरा मुंबई क्राईम ब्रँचने राज आणि शिल्पा यांच्या जुहू येथील बंगल्यावर धाड टाकली. त्यावेळी शिल्पाची काही तास कसून चौकशी करण्यात आली. मिड डेने दिलेल्या वृत्तांनुसार शिल्पाने स्पष्ट शब्दात सांगितलं की, अश्लिल व्हिडीओ बनवणे किंवा अपलोड करणे यात तिचा काहीही हात नाही.  राज कुंद्रा ज्या व्हिडीओस साठी काम करत होता ते एरोटीक व्हिडीओसआहेत पॉर्न नाहीत. पॉर्न चित्रपटांशी त्यांचा कोणताही संबध नाही. 

Web Title: mukesh khanna reacts on raj kundra pornography case says shilpa shetty must come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.