"खऱ्या आयुष्यात कोणी टपोरी असेल...", रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील भूमिकेवर काय म्हणाले मुकेश खन्ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:22 IST2024-12-19T13:20:36+5:302024-12-19T13:22:10+5:30
"कपूर कुटुंबातला असला तरी त्याचा चेहरा पाहून...", मुकेश खन्नांची प्रतिक्रिया

"खऱ्या आयुष्यात कोणी टपोरी असेल...", रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील भूमिकेवर काय म्हणाले मुकेश खन्ना?
अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' (Ramayan) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. रणबीर यामध्ये प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. सुरुवातीला रणबीरची या भूमिकेसाठी निवड करण्यावरुन खूप टीका झाली. त्याचं बीफ खाल्ल्याचं वक्तव्य पुन्हा व्हायरल करत या भूमिकेसाठी त्याची निवड होऊ नये अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत होत्या. मात्र रणबीर सारखा उत्तम अभिनेताच या भूमिकेसाठी योग्य असल्याचा दिग्दर्शक नितेश तिवारींना विश्वास होता. म्हणून त्यांनी रणबीरलाच फायनल केलं. आता यावर 'शक्तिमान' फेम अभिनेते मुकेश खन्ना यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
'रामायण' सिनेमाच्या पहिल्या पार्टचं शूट पूर्ण झालं आहे. सेटवरील रणबीर-साई पल्लवीचे काही फोटोही लीक झाले होते. श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर दिसणार यावर अभिनेते मुकेश खन्ना नुकतंच मिड डेला प्रतिक्रिया देत म्हणाले, "मी याविषयी फार काही बोलणार नाही. जर बोललो तर ते म्हणतील मी सगळ्याच गोष्टींवर कमेंट करत राहतो. लोकांनी माझी इमेज खराब केली आहे. मी काही दिवसांपूर्वी जॅकी श्रॉफच्या मुलावर कमेंट केली होती. मी काही रुड व्यक्ती नाही पण जे माझ्या मनात असचं तेच मी बोलतो. जर ते लोक रामायण बनवत आहेत तर रणबीरची अरुण गोविल यांच्याशी तुलना होऊच शकत नाही."
श्रीरामाच्या भूमिकेसाठी कोणी दुसरा अभिनेता हवा होता का? यावर ते म्हणाले, "अरुण गोविल यांनी जे काम केलं आहे ते गोल्ड स्टँडर्ड आहे. मी फक्त एवढं सांगतो की जो कोणी रामाची भूमिका करेल तो रामासारखाच असावा ना की रावणासारखा. जर खऱ्या आयुष्यात कोणी टपोरी किंवा गुंड असेल तर तो स्क्रीनवर कसा दिसेल. जर तुम्ही श्रीरामाच्या भूमिकेत आहात तर तुम्ही पार्टी किंवा ड्रिंक करु शकत नाही. पण राम कोण होणार हे ठरवणारा मी कोण? तसंच ज्याला कास्ट कराल त्याने लक्षात ठेवा की प्रभासच्या भूमिकेवर काय रिअॅक्शन आली होती. प्रभासला लोकांनी त्या भूमिकेत स्वीकारलं नाही जेव्हा की तो इतका मोठा स्टार आहे. तो वाईट कलाकार आहे यासाठी नाही पण तो श्रीरामासारखा वाटला नाही म्हणून असं झालं. रणबीर हा कपूर कुटुंबातला आहे. तो चांगला कलाकार आहे पण मी त्याचा चेहरा पाहिला तर मला श्रीराम दिसला पाहिजे. तो नुकताच अॅनिमलमध्ये दिसला होता पण त्यात त्याची निगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे."