महिलांवरील वादग्रस्त विधानावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण, म्हणाले - मी महिलांचा सर्वात जास्त सन्मान करतो...
By अमित इंगोले | Published: November 2, 2020 09:36 AM2020-11-02T09:36:24+5:302020-11-02T09:36:34+5:30
मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते मीटूबाबत महिलेंच्या सुरक्षेसहीत अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली.
प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात ते महिलांविरोधात वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. आता मुकेश खन्ना यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे.
'व्हायरल व्हिडीओ पूर्ण नाही'
मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते मीटूबाबत महिलेंच्या सुरक्षेसहीत अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. यात अभिनेते म्हणाले की, जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो केवळ एक भाग आहे आणि त्या आधारावर चुकीचं ठरवलं जाऊ शकत नाही. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ते महिलांचा खूप सन्मान करता. (सोशल मीडिया युजर्सनी घेतला मुकेश खन्ना यांचा क्लास, महिलांबद्दलचे वादग्रस्त विधान भोवले)
'माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं'
मुकेश खन्ना यांनी लिहिले की, 'मला खरंच आश्चर्य वाटतं की, माझ्या एका वक्तव्याला फारच चुकीच्या पद्धतीने सादर केलं जात आहे. मी महिलांविरोधात असल्याचं दाखवलं जात आहे. जेवढा सन्मान मी महिलांचा करतो तेवढाच कदाचितच कुणी करत असेल. त्यामुळेच महिला लक्ष्मी बॉम्बच्या नावाचा विरोध केला. मी महिलांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. प्रत्येक रेप कांडावर विरोधात मी बोलत आहे. मी हे कधीच बोललो नाही की, महिलांनी काम करू नये. मी फक्त हे बोललो होतो की, मीटू ची सुरूवात कशी होते. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. मग मी महिलांच्या काम करण्याविरोधात कसं बोलू शकतो. त्या व्हिडीओत मी केवळ महिलांनी बाहेर जाऊन काम केल्याने काय समस्या होऊ शकते यावर प्रकाश टाकत होतो. जसे की, घरात लहान मुले एकटे पडतात. मी पुरूष आणि महिलांबाबत बोलत होतो जे हजारो वर्षांपासून चालत आलं आहे'.
'मी महिलांचा नेहमी सन्मान केलाय'
मुकेश खन्ना यांनी पुढे लिहिले की, 'मी हे नाही म्हणालो की, महिला बाहेर गेल्या तर मीटू होतं. मी एक वर्षाआधी याच विषयावर एक व्हिडीओ केला होता. जो मला तुम्हाला दाखवायचा आहे. त्यात मी म्हणालो होतो की, महिलांनी कामाच्या ठिकाणी स्वत:ची सुरक्षा कशी करावी. मी तेव्हाही हे नव्हतो म्हणालो की, महिलांनी काम करू नये. तर मग आज कसं बोलू शकेल. मला आपल्या सर्व मित्रांना हे सांगायचं आहे की, माझं स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने सादर करू नका. माझं गेल्या ४० वर्षाचं करिअर हे स्पष्ट करतं की, मी महिलांचा किती सन्मान करते. हे प्रत्येक कलाकाराला आणि फिल्म यूनिटला माहीत आहे. मी नेहमीच सर्वांचा सन्मान केला आहे. जर कोणत्याही महिलांचं माझ्या वक्तव्यामुळे मन दुखावलं असेल तर मला खंत आहे की, मी माझा मुद्दा योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही. मला याची चिंता नाही की, महिलावर्ग माझ्या विरोधात होईल. माझं आयुष्य खुल्या पुस्तकासारखं आहे. सर्वांनाच माहीत आहे की, मी कसं जगलोय आणि जगतोय. मला तुम्हाला माझा पूर्ण मुलाखत दाखवायची आहे. ज्यातून ही क्लिप घेण्यात आली. तुम्हाला कळेल की, माझे महिलांबाबत काय विचार आहेत'.