Mumbai cruise drug case: Aryan Khan ड्रग्स प्रकरणी तापसी पन्नूची प्रतिक्रिया; म्हणाली, "पब्लिक फिगर असल्याचे काही फायदे, तर काही तोटे"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 12:01 PM2021-10-09T12:01:41+5:302021-10-09T12:02:27+5:30
Bollywood on Aryan Khan Drug Case : बॉलिवूडमधल्या अनेकांनी आर्यन खान प्रकरणी शाहरूख खानला पाठिंबा दर्शवला आहे. तापसी पन्नूनंदेखील (Taapsee Pannu) एका मुलाखतीदरम्यान यावर भाष्य केलं आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून (Mumbai Cru) अटक केली होती. यानंतर चौकशीदरम्यान मागील ४ वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याची कबुली त्यानं चौकशीदरम्यान दिली होती. यानंतर न्यायालयाने आर्यनचा जामीन नाकारला आहे. सध्या त्याची रवानगी आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे केवळ शाहरुखलाच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. यानंतर अनेक बॉलिवूडचे दिग्गज शाहरूखच्या आणि आर्यनच्या समर्थनार्थ पुढे आले होते. याप्रकरणी आता बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हीनंदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
"पब्लिक फिगर असल्याचं काही फायदेही असतात आणि काही तोटेही. हा फायदा आणि तोटा केवळ सेलिब्रिटींपर्यंतच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही असतो. एका स्टार स्टेटसचा एक फायदा असतोच, परंतु यादरम्यान काही नकारात्मक गोष्टीही समोर येतात. जर तुम्ही एखाद्या बड्या अभिनेत्याची मुलं असाल, तर तुम्हाला प्रिविलेज आणि फुटेज मिळतं. त्यासोबत अनेकदा उलट गोष्टीही पाहायला मिळतात. जर पुढे येणाऱ्या समस्यांबद्दल तुम्ही आधीपासून तयार असाल तर घाबरण्याचं कारण नाही. माझ्या मते जेवढं तुमची उंची अधिक असते तेवढं तुम्ही अधिक तयारही होता," असं तापसी एका मुलाखतीदरम्यान म्हणाली.
आर्थर रोड जेलमध्ये आर्यन
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या शाहरुख खानच्या मुलाला, अर्थात आर्यन खानला अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आर्यन खानच्या वकिलाकडून मुंबईच्या किला न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो शुक्रवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र इतर कैद्यासोबतच आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागली. यादरम्यान आर्यन खानला कुठल्याही प्रकारची विशेष ट्रिटमेंट देण्यात आली नाही. आर्यनला जेलमध्ये एका सामान्य कैद्याप्रमाणेच अन्न दिलं गेलं. याच बरोबर त्याला झोपण्यासाठीही सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच सुविधा देण्यात आल्या. आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक १ मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ठेवण्यात आले आहे. त्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही त्यांना स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.