सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी उचलले मोठे पाऊल, बिल्डिंगचे CCTV रेकॉर्डिंग ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 06:01 PM2020-07-07T18:01:16+5:302020-07-07T18:01:22+5:30
मुंबई पोलीस सुशांतच्या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधन होऊन 24 दिवस झाले आहे. आतापर्यंत पोलिसांनी 30 पेक्षा जास्त लोकांचा जबाब नोंदवला आहे. सुशांतचे फॅन्सचे म्हणणे आहे की त्याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. मुंबई पोलीस सुशांतच्या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सुशांतच्या बिल्डिंगची CCTV रेकॉर्डिंग ताब्यात घेतली आहे. आता पोलिस फॉरेंन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.
सुशांतच्या फॅन्ससोबतच रुपा गांगुली, शेखर सुमन आणि आणखी काही कलाकारांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत. आता त्याच्या एका चाहत्याने थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.
सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा सिनेमा चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करावा, अशी मागणी या चाहत्याने मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. एखादा चित्रपट थेट चित्रपटगृहांत रिलीज व्हावा यासाठी मानवाधिकार आयोगाला साकडे घालण्याची कदाचित भारतीय सिने इतिहासातील ही पहिली वेळ असावी.