मुंबई थिरकणार फ्रान्सच्या अली सालमीच्या नृत्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 12:27 PM2019-12-16T12:27:05+5:302019-12-16T12:32:26+5:30
सालमी नृत्याचा आगळावेगळा प्रकार मुंबईकरांसमोर घेऊन आला आहे.
फ्रान्स येथील नृत्यदिग्दर्शक अली सालमी हा अलायन्स फ्रान्सिस दि बॉंम्बे तसेच इन्स्टीट्यूट फान्सियास, रीजियन ग्रँड एस्ट आणि ओस्मोसिस सी यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा भारताला आपल्या नृत्याचे धडे देणार आहे. दि. 12 डिसेंबरपासून सुरु झालेला नृत्याचे धडे तो 19 डिसेंपर्यंत देणार आहे. सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत मुंबईच्या मलबार हिल येथील प्रियदर्शनी पार्क येथे आयोजित केले आहेत. तसेच दि.20 डिसें. रोजी सायं. 7.30 वाजता ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला आहे.तसेच या कार्यक्रमासाठी कोणतीही नोंदणी अथवा शुल्क नाही.
यावेळी सालमी नृत्याचा आगळावेगळा प्रकार मुंबईकरांसमोर घेऊन आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना एक नवा नृत्य प्रकार अनुभवायला मिळतो आहे. मुंबई,अहमदाबाद,दिल्ली आणि बंगळुरू अशा भारतातील विविध शहरांच्या भेटीत त्याने आपल्या नृत्याच्या अनन्य संकल्पना दाखवल्या आहे.
अली सालमी हा एक विशिष्ट आणि फ्रान्स समकालीन नृत्यदिग्दर्शक आहेत. कन्टेम्प्ररी या नृत्य प्रकारात तो पारंगत आहेत. याव्यतिरिक्त तो एक अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर विद्यार्थी देखील आहे.