अभिनेत्री मुमताजच्या मुलीने या बॉलिवूड अभिनेत्यासोबत केलं लग्न, फोटो पाहून बसणार नाही विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:52 IST2023-03-22T13:50:49+5:302023-03-22T13:52:43+5:30
Mumtaz daughter : मुमताजने 1974 मध्ये मयूर वाधवाणीसोबत लग्न केलं होतं. तिला दोन मुली आहेत. ज्यांची नावे नताशा आणि तान्या आहेत. यातील एका मुलीने बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न केलं.

अभिनेत्री मुमताजच्या मुलीने या बॉलिवूड अभिनेत्यासोबत केलं लग्न, फोटो पाहून बसणार नाही विश्वास!
Mumtaz daughter : मुमताज आपल्या काळातील सगळ्यात फेमस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. मुमताज तिच्या काळातील सगळ्यात ग्लॅमरस आणि फिट अभिनेत्री होती. तेव्हाच्या सगळ्याच मोठ्या स्टारसोबत तिने काम केलं. आज भलेही ती बॉलिवूडपासून दूर आहे. पण आजही तिच्या सुंदरतेची चर्चा होत असते. मुमताजने 1974 मध्ये मयूर वाधवाणीसोबत लग्न केलं होतं. तिला दोन मुली आहेत. ज्यांची नावे नताशा आणि तान्या आहेत. यातील एका मुलीने बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न केलं.
मुमताजची मुलगी नताशा सुंदरतेबाबत तिच्या आईपेक्षा जराही कमी नाहीये. तिची सुंदरता पाहिल्यावर तुम्हीही तिचे फॅन व्हाल. नताशाचे तसे तर सोशल मीडियावर अनेक फोटो आहेत. पण आज आम्ही एक असा फोटो घेऊन आलो जो तुम्ही पाहिला नसेल. नताशाने बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न केलं. हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याचं नाव आहे फरदीन खान. यात फोटोत ती पती फरदीन खानसोबत दिसत आहे. दोघे सोबत सुंदर दिसत आहेत.
नताशा आणि फरदीनने 2005 मध्ये लग्न केलं. त्यांना दियानी नावाची एक गोड मुलगीही आहे. दरम्यान फरदीन खान काही दिवसांआधी त्याच्या फिटनेसबाबत खूप चर्चेत होता. गेल्या काही वर्षांपासून तो सिनेमापासून दूर आहे. त्यामुळे त्याचं वजनही वाढलं होतं. पण तो आता बराच फिट झाला आहे.