असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:05 PM2024-06-06T13:05:21+5:302024-06-06T13:06:19+5:30

'मुंज्या' या बॉलिवूडच्या आगामी हॉरर सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांना सिनेमाा पाहण्यासाठी खास चॅलेंज दिलंय (munjya)

Munjya movie midnight special show at pvr inox for horror fans | असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल

असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल

'मुंज्या' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. 'फास्टर फेणे', 'नारबाची वाडी', 'माऊली' अशा सुपरहिट मराठी सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या आदित्य सरपोतदार या निमित्ताने बॉलिवूड सिनेमाची धुरा सांभाळतोय. 'मुंज्या'चा टिझर, ट्रेलर उत्कंठावर्धक होता. त्यामुळे सिनेमा कसा असेल याची चर्चा सुरु झालीय. अशातच 'मुंज्या'च्या मेकर्समे प्रेक्षकांना खास चॅलेंज दिलंय. मध्यरात्री निवडक ठिकाणी 'मुंज्या'चे स्पेशल शो होणार आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तर

'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो

'मुंज्या' सिनेमाची चर्चा शिगेला असतानाच आज मध्यरात्री 'मुंज्या'चे स्पेशल शो लागणार आहेत. लाईट्स ऑफ आणि किंकाळ्या सुरु अशी टॅगलाईन ठेवून मेकर्सने 'मुंज्या' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास चॅलेंज दिलंय. हॉरर सिनेमांची आवड असणाऱ्या फॅन्ससाठी हे स्पेशल स्क्रिनिंग म्हणजे पर्वणी ठरणार आहे. आज ६ जूनला PVR, INOX थिएटर्समध्ये रात्री ११.३० ते ११.४५ या दरम्यान 'मुंज्या'चे स्पेशल शो आहेत. मुंबईत निवडक ठिकाणी हे शो असून बूक माय शो वर तुम्ही याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

'मुंज्या' सिनेमाबद्दल

'मुंज्या' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून मुंज्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  ७ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Munjya movie midnight special show at pvr inox for horror fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.