थिएटरमध्ये घाबरवणारा 'मुंज्या' आता ओटीटीवर यायला सज्ज! कधी? कुठे? बघायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:41 AM2024-06-20T11:41:52+5:302024-06-20T11:42:58+5:30

थिएटर गाजवणारा 'मुंज्या' सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. सविस्तर जाणून घ्या (munjya)

munjya movie ott release date hotstar starring sharvari wagh abhay varma | थिएटरमध्ये घाबरवणारा 'मुंज्या' आता ओटीटीवर यायला सज्ज! कधी? कुठे? बघायला मिळणार

थिएटरमध्ये घाबरवणारा 'मुंज्या' आता ओटीटीवर यायला सज्ज! कधी? कुठे? बघायला मिळणार

सध्या चित्रपटगृहांमध्ये एका हिंदी सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा म्हणजे 'मुंज्या'. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधला हा सिनेमा बघायला हाऊसफुल्ल गर्दी होतेय. अशातच 'मुंज्या' आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचताय. 'मुंज्या' लवकरच ओटीटीवर रिलीज व्हायला सज्ज झालाय.

'मुंज्या' कोणत्या ओटीटीवर कधी रिलीज होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ने विकत घेतले आहेत. आजपासून २ महिन्यांनंतर हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच ऑगस्टदरम्यान  'मुंज्या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज व्हायची शक्यता आहे.

 'मुंज्या' सिनेमाविषयी थोडंसं

'स्त्री', 'रुही' आणि 'भेडिया' या सिनेमांनंतर मॅडॉक फिल्मच्या माध्यमातून हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील चौथा चित्रपट आणला आहे तो म्हणजे 'मुंज्या'. कॉमेडी एंटरटेनमेंटचं पॅकेज असलेला  'मुंज्या' सर्वांना आवडला. सिनेमाची कथा एकदम फ्रेश आहे. चित्रपटात शर्वरी, अभय वर्मा, मोना सिंग, सत्यराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत.

Web Title: munjya movie ott release date hotstar starring sharvari wagh abhay varma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.