‘मुन्ना मायकल’च्या अपयशामुळे निधी अग्रवालने पत्राद्वारे व्यक्त केली ‘मन की बात’; वाचा तिच्याच शब्दात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 07:26 AM2017-08-19T07:26:13+5:302017-08-19T14:20:30+5:30

प्रचंड प्रयत्न करूनही प्रेक्षकांची मने जिंकण्यास अपयशी ठरलेली ‘मुन्ना मायकल’ची अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून येत ...

'Munn talk', expressed by the letter in advance of funds due to Munna Michael's failure; Read her words! | ‘मुन्ना मायकल’च्या अपयशामुळे निधी अग्रवालने पत्राद्वारे व्यक्त केली ‘मन की बात’; वाचा तिच्याच शब्दात!

‘मुन्ना मायकल’च्या अपयशामुळे निधी अग्रवालने पत्राद्वारे व्यक्त केली ‘मन की बात’; वाचा तिच्याच शब्दात!

googlenewsNext
रचंड प्रयत्न करूनही प्रेक्षकांची मने जिंकण्यास अपयशी ठरलेली ‘मुन्ना मायकल’ची अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. निधीने ‘मुन्ना मायकल’मध्ये टायगर श्रॉफसोबत आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. परंतु बॉक्स आॅफिसवरील चित्रपटाचे यश पाहता निधी आणि टायगरचा अभिनय प्रेक्षकांना फारसा भावला नसावा, असेच दिसत आहे. अशात आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी निधीने एक पत्र लिहिले असून, त्यामधून तिने इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाºयांना एकप्रकारचा संदेश दिला आहे. निधीने पत्रात नेमके काय लिहिले असेल? वाचा तिच्या शब्दात...

गेल्या महिन्यात रिलिज झालेल्या ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मी कधीच हा विचार केला नव्हता की, एका चित्रपटातून मला एवढी मोठी शिकवण मिळेल. ही शिकवण म्हणजे बॉलिवूडमध्ये डील करण्याचा एक क्रेश कोर्सच आहे. माझे मत, माझे विचार आणि माझ्या अनुभव याचे कोणाला काहीच देणे-घेणे नाही. मात्र मला विश्वास आहे की, इंडस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणाºयांमध्ये केवळ मी एकमेव नसून, इतरही काही लोक आहेत, जे त्यांच्या स्वप्नांच्या शोधात आहेत. अशाच लोकांशी मला माझ्या या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी ‘मन की बात’ करायची आहे. 

जरा विचार करा, बंगळुरूची एक छोटी मुलगी अशक्य स्वप्न घेऊन येते. एका गुरुवारी तिचे स्वप्न पूर्ण होते आणि शुक्रवारी २४ तासांनंतर असे वाटते की, तिचे स्वप्न आता अडचणीत आहे. कल्पना करा, ज्या चित्रपटासाठी तुम्ही आयुष्यभर स्वप्न बघितलेले असते त्याच चित्रपटावर चित्रपट समीक्षकांकडून टीका केली जात असेल तर? याचा अर्थ तुमचा प्रवास सुरू होण्याअगोदरच संपण्याच्या मार्गावर असतो. ही एक सॅड स्टोरी नाही. तर ही स्टोरी अपेक्षा आणि उपेक्षा याची आहे. सोमवारी सकाळी उठल्यानंतर या गोष्टीचे चिंतन करायला हवे की, तुम्ही सुपरस्टारडम रॉकेट शिपवर बसलेले नाहीत. मात्र तुमचे स्वप्न खरे आणि जिवंत असेल तर तुम्ही एक दिवस तरी सुपरस्टारडम मिळवू शकता, ही संभावना मनात ठेवण्यास हरकत नाही. 



रिलिज विकेंडने माझ्यासाठी एका रिमायंडरसारखे काम केले आहे, ज्याने मला समजावून सांगितले की, आपण एका अशा समाजात वावरतो, जिथे तत्काळ निकाल, टीका आणि नकारात्मकतेवर लोक लगेचच आणि बिनधास्त प्रतिक्रिया देतात. या जगात जर मुक्तपणे जगायचे असेल, आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचे असेल तर तुम्ही याचा नेहमीच विचार करायला हवा की, जगातील नकारात्मकतेचा तुमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर हा करिष्मादेखील नेहमीच मनात ठेवावा की, एक सर्वसामान्य मुलगी जिचा बॉलिवूडशी काहीही संपर्क नव्हता ती आज इथवर पोहोचली आहे. 

मी एका अशा परिवारामधून आहे, ज्यांचा बॉलिवूड, चित्रपट आणि मनोरंजन जगताशी कुठलाही संबंध नाही. लाखो परिवारांप्रमाणे आम्हीही त्या सुंदर लोकांना बघत आलो आहोत. त्यांचे स्टारडम बघताना आमच्याही अंगावर रोमांच निर्माण व्हायचा. आम्ही नेहमी चेष्टामस्करीत म्हणायचो, ‘चित्रपटात काम करणार आणि या परिवारातून’ बस्स हीच बाब आमच्या परिवारात हास्य निर्माण करायची. कारण माझ्या परिवारासाठी हा कधीच गंभीर मुद्दा नव्हता. अशातही मी झगमगणाºया दुनियेत आहे. अर्धा मिलियनपेक्षा अधिक लोक मला इन्स्टाग्रामवर फॉलो करीत आहेत. चाहते माझ्या मागे विमानतळ आणि हॉटेलपर्यंत येत आहेत. लहान मुले मला नावाने हाक मारत आहेत. मला याचा आनंद होत आहे की, भलेही माझा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला नाही, परंतु लाखो लोक माझा चित्रपट आजही बघत आहेत. त्यामुळे लोकांचे हे प्रेम बघून त्यांच्यापुढे माझे अपयश खूप कमी वाटते. आज मी याठिकाणी असण्याचे एकमेव कारण म्हणजे मी अजूनही पराभूत झालेली नाही. 
- निधी अग्रवाल

Web Title: 'Munn talk', expressed by the letter in advance of funds due to Munna Michael's failure; Read her words!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.