'मुन्नाभाई MBBS'मधील डॉक्टर रुस्तममध्ये झालाय कमालीचा बदल; फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 15:22 IST2022-03-13T15:21:10+5:302022-03-13T15:22:00+5:30
Munnabhai mbbs: सध्या सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यात झालेला बदल दिसून येत आहे.

'मुन्नाभाई MBBS'मधील डॉक्टर रुस्तममध्ये झालाय कमालीचा बदल; फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला संजय दत्तचा 'मुन्नाभाई MBBS' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. आजही हा चित्रपट अनेकांच्या फेव्हरेट मुव्ही लिस्टपैकी एक आहे. या चित्रपटातील कथानकासोबतच त्यातील कलाकारांचा अभिनयही वाखाणण्याजोगा होता. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे कुरुश देबू. या चित्रपटात कुरुश यांनी सतत चिडचिड करणाऱ्या डॉक्टर रुस्तम यांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या डॉक्टर रुस्तममध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे ते काय करतात हे जाणून घेऊयात.
कुरुश देबू यांचा बॉलिवूडमधील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, ते गुजराती कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. तसंच सोशल मीडियावरही त्याचा चांगला वावर आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यात झालेला बदल दिसून येत आहे.
चित्रपटातील डॉक्टर रुस्तम यांच्यात आता कमालीचा बदल झाला आहे. ते आता थोडेसे वयस्कर दिसत असून त्यांच्या वजनातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एका नजरेत त्यांना ओळखणं तसं कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट केल्या आहेत.
इतके दिवस कुठे होतात सर, असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. तर,सर, पुन्हा कधी कमबॅक करताय असाही प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. कुरुश यांनी 'मुन्नाभाई' व्यतिरिक्त 'हॅप्पी हसबंड्स', 'फोर टू का वन', 'शीरीन फरहाद की तो निकल पडी' अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.