सुशांत सिंग रजपूतच्या वर्षश्राद्धाला ठेवण्यात आली होती प्रार्थनसभा, फजची अवस्था पाहून येईल डोळ्यांत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:51 IST2021-06-15T17:44:09+5:302021-06-15T17:51:38+5:30
या फोटोंत आपल्याला सुशांतचा कुत्रा फजचा देखील फोटो पाहायला मिळत आहे. फज उदास बसलेला दिसत असून त्याची ही अवस्था पाहून सुशांतच्या चाहत्यांना प्रचंड वाईट वाटत आहे.

सुशांत सिंग रजपूतच्या वर्षश्राद्धाला ठेवण्यात आली होती प्रार्थनसभा, फजची अवस्था पाहून येईल डोळ्यांत पाणी
काही तारखा कधीच विसरता येत नाहीत. बॉलिवूडप्रेमींसाठी 14 जून ही तारीख यापैकीच एक. आजची ही तारीख बॉलिवूडप्रेमींना एक भळभळती जखम देऊन गेली होती. गेल्यावर्षी 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) जगाला अलविदा म्हटले होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा सुशांत अचानक जग सोडून निघून गेला होता. (Sushant Singh Rajput Death Anniversary) कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणा-या सुशांतने काळासोबत लीड अॅक्टरपर्यंतचा पल्ला गाठला.
सुशांतच्या निधनाला काल वर्षं झाले. त्याच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने काल त्याच्या तीन बहिणींनी प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. या प्रार्थनासभेचे काही फोटो त्याची बहीण प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंत आपल्याला सुशांतचा कुत्रा फजचा देखील फोटो पाहायला मिळत आहे. फज उदास बसलेला दिसत असून त्याची ही अवस्था पाहून सुशांतच्या चाहत्यांना प्रचंड वाईट वाटत आहे.
सुशांतला फज प्रचंड मिस करत असल्याचे आपल्याला या फोटोंवरून दिसून येत आहे. प्रियंकाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सुशांतच्या तिन्ही बहिणी त्याच्या फोटोच्यासमोर दिसत असून त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा असे या फोटोंसोबत प्रियंकाने लिहिले आहे.