ऐकलं का? सलमान खान- कॅटरिना कैफ घेऊन येताहेत ‘नच बलिए’चे नवे सीझन !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 14:45 IST2019-02-22T14:44:20+5:302019-02-22T14:45:18+5:30
होय, ‘नच बलिए’ या शोसाठी सलमान खान आणि कॅटरिना कैफ हातमिळवणी करणार आहेत.

ऐकलं का? सलमान खान- कॅटरिना कैफ घेऊन येताहेत ‘नच बलिए’चे नवे सीझन !!
धमाकेदार डान्सिंग रिअॅलिटी शो ‘नच बलिए’ प्रेक्षकांच्या आवडत्या शोपैकी एक आहे. या शोचे प्रत्येक सीझन गाजले. अनेक जोड्यांनी आपल्यातील डान्स टॅलेन्ट पणाला लावत परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही मने जिंकलीत. आता संपूर्ण वर्षभरानंतर या शोचे नवे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होय, बॉम्बे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका नव्या अंदाजात हा नवा शो लॉन्च होणार आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये टीव्हीच्या सुप्रसिद्ध जोड्या वा विवाहित कपल्स दिसलेत. पण यावेळी शोला नवा तडका देत, ब्रेकअप झालेल्या जोड्या ‘नच बलिए’च्या मंचावर थिरकताना दिसतील. म्हणजेच, शोचे स्पर्धक आपल्या एक्स गर्लफ्रेन्ड वा एक्स बॉयफ्रेन्डसोबत दिसतील. अर्थात अद्याप याबाबतची घोषणा व्हायचीय. पण लवकरच ही घोषणा होईल असे कळतेय. विशेष म्हणजे,या शोसाठी सलमान खान आणि कॅटरिना कैफ हातमिळवणी करणार आहेत. होय, ताजी बातमी खरी मानाल तर, सलमान हा शो प्रोड्यूस करणार आहे तर कॅटरिना या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. आहे ना मजेदार...
‘नच बलिए’च्या मागच्या सीझनमध्ये दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया, आश्का गोराडिया-ब्रेंट गोबल, सनाया इराणी-मोहित सहगल, भारती सिंग-हर्ष लिम्बाचिया, दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम सारख्या सेलिब्रिटी जोड्यांनी धूम केली होती. दिव्यांका व विवेक या सीझनचे विजेते ठरले होते. आता नव्या सीझनमध्ये कुण्या नव्या जोड्यांची वर्णी लागते आणि कॅटरिना जज बनून शोमध्ये किती रंग भरते, ते बघुच.