Naga Shaurya: नागा शौर्याला ‘नो वॉटर डाएट’ पडलं भारी; लग्नाला 3 दिवस असताना अभिनेता सेटवर बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 13:31 IST2022-11-17T13:29:02+5:302022-11-17T13:31:27+5:30
Naga Shourya Hospitalised: टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागा शौर्या सोमवारी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेशुद्ध पडला.

Naga Shaurya: नागा शौर्याला ‘नो वॉटर डाएट’ पडलं भारी; लग्नाला 3 दिवस असताना अभिनेता सेटवर बेशुद्ध
Naga Shourya Hospitalised: टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागा शौर्या सोमवारी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेशुद्ध पडला. सेटवर अचानक आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. नागा शौर्याला हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शरीरात अशक्तपणा आल्याने नागा शौर्य यांची प्रकृती खालावली आहे. टॉलिवूड कलाकार 20 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. नागाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि चाहते चिंतेत आहेत.
‘NS 24’ या चित्रपटात नाग शौर्यचे बरेच ॲक्शन सीक्वेन्स आहेत. या ॲक्शन सीनदरम्यान परफेक्ट बॉडी दिसण्यासाठी तो नो वॉटर डाएट करत होता, अशीही माहिती समोर आली आहे. म्हणजेच तो कोणत्याही प्रकारचे द्रव्य पदार्थांचं सेवन करत नव्हता. नॉन-लिक्विड डाएट आणि सिक्स-पॅक ॲब्ससाठी तासनतास जिममध्ये व्यायाम केल्याने त्याची तब्येत बिघडल्याचं कळतंय.
२० नोव्हेंबरला होणार लग्न
20 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये इंटिरियर डिझायनर अनुषा शेट्टीसोबत लग्न करणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नागा आणि अनुषाचे लग्न एक ग्रॅंड फेअर असेल, ज्यामध्ये दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील. नागा आणि अनुषाचा मेहंदी सोहळा 19 नोव्हेंबरला होणार आहे.
नागा शौर्या एक अभिनेता तसेच चित्रपट लेखक आणि निर्माता आहे. तो प्रामुख्याने तेलुगु सिनेमात काम करतो. नागा आणि अनुषाचे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नागा शौर्याने तिच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर शेअर केली आहे. नागा शौर्याचे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.