Nagarjuna Birthday : तब्बूनं 15 वर्ष प्रतीक्षा केली, त्याच्यासाठी मुंबई सोडली पण नागार्जुन मानला नाही...; पुढे ...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 08:00 AM2022-08-29T08:00:00+5:302022-08-29T08:00:01+5:30

Nagarjuna Birthday : नागार्जुनच्या लव्ह लाईफची त्याच्या चित्रपटांइतकीच चर्चा झाली. होय, त्यानं दोन लग्न केलीत.  एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचं त्याचं अफेअरही चांगलंच गाजलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तब्बू ( Tabu) होती.

nagarjuna birthday akkineni nagarjuna had an affair with tabu | Nagarjuna Birthday : तब्बूनं 15 वर्ष प्रतीक्षा केली, त्याच्यासाठी मुंबई सोडली पण नागार्जुन मानला नाही...; पुढे ...!!

Nagarjuna Birthday : तब्बूनं 15 वर्ष प्रतीक्षा केली, त्याच्यासाठी मुंबई सोडली पण नागार्जुन मानला नाही...; पुढे ...!!

googlenewsNext

Nagarjuna Birthday   : साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनची (Akkineni Nagarjuna) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्याला अख्खं जग ओळखतं. आज याच चाहत्यांच्या लाडक्या नागार्जुनचा वाढदिवस. 29 ऑगस्ट 1959 रोजी जन्मलेल्या नागार्जुनला वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला. त्याचे वडिल नागेश्वर राव अक्किनेनी तेलगू सिनेमाचे मोठे सुपरस्टार होते.  साऊथ सिनेमांशिवाय नागार्जुनने बॉलिवूडमध्येही  नशीब आजमावलं. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी त्याचा दबदबा राहिला. 

 तब्बू नागार्जुनसाठी अक्षरश: वेडी झाली होती...
नागार्जुनच्या लव्ह लाईफचीही त्याच्या चित्रपटांइतकीच चर्चा झाली. होय, त्यानं दोन लग्न केलीत.  एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचं त्याचं अफेअरही चांगलंच गाजलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तब्बू ( Tabu) होती. होय, एका चित्रपटाच्या सेटवर नागार्जुन व तब्बूची पहिली भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.

 तब्बू तर नागार्जुनसाठी अक्षरश: वेडी झाली होती. इतकी की, मुंबई सोडून तिने हैदराबादेत नागार्जुनच्या शेजारी घर घेतलं होतं. तब्बूने तब्बल 15 वर्ष नागार्जुनची प्रतीक्षा केली. पण नागर्जुन मानला नाही. कारण तो आधीच विवाहित होता. तब्बूसाठी  पत्नीला घटस्फोट द्यायला तो तयार नव्हता. अखेर तब्बूनेच माघार घेतली.  तिने नागार्जुनसोबतचं नातंसंपवण्याचा निर्णय घेतला आणि  2012 मध्ये दोघंही कायमचे विभक्त झालेत.  तब्बू  आजही अविवाहित आहे...

पहिल्या पत्नीला घटस्फोट देत अमलाशी थाटला संसार..

नागार्जुननं दोन लग्नं केलीत. 1984 मध्ये त्याने लक्ष्मी दग्गुबतीसोबत लग्न केलं. 1986 मध्ये दोघांना मुलगा झाला. नागा चैतन्य हे त्याचंनाव. 1990 मध्ये नागार्जुन व लक्ष्मीचा घटस्फोट झाला. यानंतर नागार्जुन यांनी अभिनेत्री अमला अक्किनेनीसोबत दुसरे लग्न केलं. दोघांना अखिल अक्किनेनी नावाचा मुलगा आहे. नागार्जुन व अमला या दोघांची लव्हस्टोरी फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही.  अमला नागार्जुनच्या प्रेमात पडली तेव्हा नागार्जुन आधीच विवाहित होता. अमलाचे म्हणाल तर, ती साऊथची सुपरस्टार होती. यश, पैसा, प्रसिद्धी सगळं काही तिच्या पायाशी लोळणं घेतं होतं. नागार्जुनसोबत अमलानं अनेक सिनेमात काम केलं आणि एकत्र काम करता करता नागार्जुनच्या प्रेमात ती सुद्धा तब्बूसारखीच वेडी झाली.  या प्रेमाची सुरूवात झाली ती एका फिल्मी वाटाव्या अशा एका सीनने.

होय, अमला तिच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होती. नागार्जुन तिला सप्राईज देण्यासाठी सेटवर पोहोचला होता. पण पाहतो तर काय अमला रडत होती. पुढच्या सीनमध्ये मला जे कपडे घालायचे आहेत ते खूप विचित्र आहेत आणि मला ते घालायचे नाहीत, असं तिनं रडत रडत नागार्जुनला सांगितलं. यावर नागार्जुन लगेच दिग्दर्शकाशी बोलला. मग काय, सुपरस्टारचा शब्द कोण खाली जाऊ देणार? दुसऱ्याच क्षणाला अमलाला तिचे कपडे बदलून मिळाले. नागार्जुनच्या या वागण्यानं अमला इम्प्रेस होणारच. ती अक्षरश: त्याच्यावर भाळली.  मग दोघांच्याही नात्याची चर्चा झाली झाली. अशाच एका सिनेमाच्या शूटींगसाठी अमला आणि नागार्जुन परदेशात गेले होते. जिथं नागार्जुनने अमलाला खास पद्धतीने प्रपोज केलं होतं. अर्थात त्याआधी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा होता. अमलाचा होकार मिळाल्यानंतर नागार्जुननं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 1992 साली नागार्जुन आणि अमला यांनी एकमेकांशी लग्न केलं.  

Web Title: nagarjuna birthday akkineni nagarjuna had an affair with tabu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.