नागार्जुन यांनी सून समंथाशी केले चॅट...झाले व्हायरल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 09:56 AM2017-05-18T09:56:08+5:302017-05-18T15:28:04+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि त्याची होणारी सून यांच्यातील प्रेमळ नाते, जगापुढे आले आहे. होय, सासरा अन् सूनेचे चॅट सोशल ...
नागार्जुन समंथाला ‘कोडला’ संबोधतात हे चॅटचा फोटो पाहून लक्षात येत आहे. मुलाच्या चित्रपटाचे ट्रेलर पाहिल्यानंतर नागार्जुन यांनी सून समंथाचे अभिनंदन केले. समंथानेही आभार मानलेत.मामा, मलाही ट्रेलर आवडलाय. त्याचे काम आवडलेय. मला खूप आनंद होतोय, असे तिने लिहिलेय. आता हे चॅट पाहिल्यानंतर या सेलिब्रिटी कुटुंबातील नात्याचे बंध कसे असतील याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.
नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याचा प्रेयसी आणि प्रसिद्ध अभिनेत्री समंथा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे दोघे ब-याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडिया आणि चाहत्यांच्या वतुर्ळात समंथा आणि नागा चैतन्य यांना ‘समचै’म्हणून ओळखले जाते. यावर्षाअखेर टॉलिवूडची ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.