नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमाचं पोस्टर आऊट, बिग बी दिसणार 'या' भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:35 PM2020-01-20T12:35:38+5:302020-01-20T12:52:24+5:30
अमिताभ बच्चन व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
अमिताभ बच्चन व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. हा सिनेमाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टर अमिताभ बच्चन पाठ मोऱ्या अंदाजात उभे दिसतायेत. अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
अमिताभ यांचा हा सिनेमा फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा सिनेमा भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकचं त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सुरूवातीला सिनेमाच्या मेकर्सवरच कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. अनेक वादाला बाजुला सारत हा सिनेमा अखेर पूर्ण झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. शूटिंग दरम्यानच अमिताभ यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती. केवळ आमिर खानच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन पुन्हा या सिनेमात काम करण्यास तयार झाले. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत झळकणार असल्याचे समजतंय.