अभिनेत्री वाढदिवसाच्या पार्टीत करत होती ड्रग्सचे सेवन, पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 15:30 IST2021-06-15T15:28:38+5:302021-06-15T15:30:14+5:30
ही अभिनेत्री आणि तिचे मित्रमैत्रीण पार्टीत ड्रग्सचे सेवन करत होते. पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या हॉटेलवर छापा मारला आणि ड्रग्स जप्त केले.

अभिनेत्री वाढदिवसाच्या पार्टीत करत होती ड्रग्सचे सेवन, पोलिसांनी केली अटक
मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका अभिनेत्रीला ड्रग्ससोबत अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्रीची वाढदिवसाची पार्टी एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात तिचे काही मित्र-मैत्रीण होते. ही अभिनेत्री आणि तिचे मित्रमैत्रीण पार्टीत ड्रग्सचे सेवन करत होते. पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या हॉटेलवर छापा मारला आणि ड्रग्स जप्त केले. या प्रकरणात या अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे.
नैरा नेहल शहा असे या अभिनेत्रीचे नाव असून रविवारी रात्री तीन वाजता पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला आणि या पार्टीत ड्रग्स घेणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. सांताक्रूझ पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर गनोरे यांना ड्रग्स पार्टीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमसोबत हॉटेलवर छापा मारला. नैरा आणि तिचा मित्र आशिक हुसैन यांना चरस घेताना पोलिसांनी पकडले असून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
नैरा नेहल शहाने काही तमीळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.