सोहाला नेटीजन्सने विचारला आरबीआयचा फुलफॉर्म!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2016 01:42 PM2016-06-20T13:42:35+5:302016-06-20T19:12:35+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान हिने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची बाजू घेतली. पण सोहाने याबाबत टिष्ट्वट करताच ...
हे कदाचित अनेकांना माहित नसावे...
सोहाने एकदम रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरबाबत टिष्ट्वट करावे, याचे अनेकांना आश्चर्य वाटले असावे.(कारण बॉलिवूड कलाकारांना अशा गंभीर व तात्विक मुद्यांवर बोलण्याचा हक्क नाही, असा गैरसमज अनेकजण बाळगून आहेत.) पण अनेकांना माहिती नसावे की सोहा ही लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सची पदवीधर आहे. सोहाने लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. बॉलिवूड अभिनेत्री बनण्यापूर्वी सोहा एक बँकर्स होती, हेही अनेकांना ठाऊक नसावे. कदाचित याच अज्ञानातून अनेकांनी सोहाचे ‘नॉलेज’ काढले असावे??